राजीव गांधी तलावातील जलपर्णी वाढल्यामुळे कात्रज परिसरातील नागरिकांना डासाचा त्रास
पुणे : कात्रज प्राणी संग्रालय तील मुख्य तलावात जलपर्णी मोठया प्रमाणात वाढ झाली आहे तलावातील आजूबाजूला कात्रज परिसरातील दीड किलोमीटर भागात सहकारी ग्रह रचना संस्था मधील नागरिकांना डासाचा त्रास होऊ लागला आहे. डास दिवसा व रात्री चे ही चावतात. साध्य डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता वाढत आहे कारण हे डास पांढऱ्या पट्ट्याचे आहेत डास चावत असल्यामुळे नागरिक तक्रार करत आहे
तसेच तलावात जलपर्णी मोठया प्रमाणात वाढली असल्यामुळे डासाची उत्पती होत आहे त्यामुळे जलपर्णी काढून डासाच्या उत्पती वर नियंत्रण आणता येईल अशी कात्रज करांच्या वतीने सौं मनीषा ताई राजाभाऊ कदम माजी नगरसेवका यांनी आज पुणे महानगरपलिका आयुक्त यांना नागरिकांना होणाऱ्या त्रासा पासून मुक्तता व्हवी अशी तक्रार केली आहे
नगरसेविका मनिषाताई राजाभाऊ कदम , राजाभाऊ कदम ,कल्पनाताई शेलार,सागर ढुरे ,संतोष माने , प्रकाश वाशिलकर, मोहन पानसकर, मनोज बलकवडे,प्रकाश सासवडे,रुद्र अंभग यावेळी उपस्थित होते