fbpx

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू; नातेवाईकांनी व्यक्त केली शंका

पुणे : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता नातेवाईकांनी वर्तवली आहे. मधू मार्कंडेय असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. या घटनेप्रकरणी वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मधू मार्कंडेय ही केक बनवण्याचं काम करायची. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने ती आणि तिची मैत्रीण रविवारी भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथं मधूला अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. दातखिळी देखील बसल्याने मैत्रिणीने ती काढण्याचा प्रयत्न केला. मधूला तिच्या मैत्रिणीने तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन गेली. परंतु, तिला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथं गेल्यानंतर मधूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या सर्व प्रकरणावर मधूच्या नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. वाकड पोलिसांनी मात्र तिच्या शरीरावर गंभीर दुखापत नाही असं सांगितलं असून अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत. नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय मधूचा घातपात झाला असावा असा आमचा संशय आहे. पंधरा दिवसांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं असून ती दोन मुलांसह राहाटणीत राहत होती. तिच्यासोबत गेलेली मैत्रीण आम्हा कोणाला माहीत नाही. म्हणून आम्हाला तिच्या मृत्यूविषयी संशय असल्याचे संतोष पोकळे या त्यांच्या नातेवाईकाने सांगितले. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: