fbpx

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बोपोडीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

पुणे  : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, औंध रोड येथे समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा स्मृतीचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच  कै. पिंट्या उर्फ किरण सूर्यवंशी प्रतिष्ठानच्या नामफलकाचे उदघाट्न पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद आणि मनीष आनंद यांच्या हस्ते करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मनीष आनंद यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला; तसेच नामफलकालाही  पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुणे महापालिकेच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, एसीपी आरती बनसोडे, छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, राकेश भरणे, नितीन धोतरे, प्रफुल्ल देवकुळे, बाळासाहेब चोरघे, खोमणे मॅडम, ऍड. सुशांत बनसोडे, रमेश सेठ , बाबा आगरवाल, विजय जाधव , इंद्रजित भालेराव, ऍड. विठ्ठल आरुडे, साजिद शेख, मयुरेश गायकवाड, रमा भोसले, अर्चना वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचे यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये गोरगरिबांची सेवा करणारे डॉ. अलेक्झांडर, मातंग संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेले प्रदीप कांबळे, जेष्ठ कार्यकर्ते मुरलीधर मोहिते, समाजसेविका ज्योतीताई भिंगारे, कोरोनायोद्धया परिचारिका वर्षा कांबळे, अंगणवाडी सेविका संध्या खरात, बौद्धाचार्य डी. एस. गायकवाड, विठ्ठल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे, आदी सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन संजय निकाळजे यांनी, तर आभार कार्यक्रमाचे आयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांनी मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: