fbpx

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी विमेन इन हॉस्पिटॅलिटी या आयआयएचएम ग्लोबल कॉन्फरन्स चे आयोजन

पुणे – इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयआयएचएम) तर्फे प्रथमच आयआयएचएम ग्लोबल कॉन्फरन्स ऑन विमेन इन हॉस्पिटॅलिटी चे आयोजन आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते यावेळी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महिला तज्ञ आणि नेत्या एकत्र येऊन त्यांनी या क्षेत्रातील अनुभव, विचारआणि आव्हाने यांवर चर्चा केली. या उपक्रमाचे आयोजन हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात महिलांनी भाग घेऊन त्यांना शक्तीशाली करत या क्षेत्रातील लैंगिक विषमता व आव्हानांचा मुकाबला करण्यास महिलांना सक्षम करण्यासाठी करण्यात आले होते.
आयआयएचएम ग्लोबल कॉन्फरन्स फॉर विमेन इन हॉस्पिटॅलिटी २०२३ चे आयोजन म्हणजे आयआयएचएम कडून युनायटेड नेशन्सच्या एसडीजी गोल नं ५- लैंगिक समानता च्या लक्ष्यानुसार आहे. या जागतिक कॉन्फरन्स मध्ये सहा सत्रे होती, प्रत्येक सत्र हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाशी संबंधित विविध घटकांवर आधारीत होते.

या सत्रांमध्ये खालील विषय होते- विमेन लीडर्स इन द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री: ओव्हरकमिंग जेंडर बॅरियर्स ॲन्ड चॅलेंजेस
विकसनशील देशांमधील महिलांची व्यावसायिकता आजच्या महिला शेफ्स : पुरुषांचा ढासळणारा बुरुज हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील वैविध्य आणि सर्वसमावेशकता : जेंडर न्युट्रल कार्यस्थळाची निर्मिती करणे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील शाश्वततेचा प्रसार करण्यासाठी महिलांचे योगदान हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व आणि करियर मधील वाढ यावेळी जगभरांतील तज्ञ वक्त्यांनी यावेळी आपली प्रोत्साहक आणि संबंधित विषयांवर आपली मते व्यक्त केली.

पहिल्या सत्रा मध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महिला नेत्यांची भाषणे झाली विशेषकरुन अशा महिलांची ज्यांनी त्यांच्या संस्थेत अडचणींचा सामना करत उच्च पद प्राप्त केले आहे. या सत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा करुन महिलांनी कशा प्रकारे पुरुषप्रधान अशा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आव्हानांवर मात केली व त्यांची मते व्यक्त केली. दुसर्‍या सत्रात विकसनशील देशांमधील महिला व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. महिला व्यावसायिकांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागतो आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र ही त्याला अपवाद नाही. तिसर्‍या सत्रा मध्ये अशा महिला शेफ्स होत्या ज्यांनी हॉटेल आणि रेस्तरॉ किचन्स मध्ये आपले नाव नवीन उंचीवर नेले आहे. परंपरागतदृष्ट्या हे क्षेत्र पुरुषप्रधान असूनही त्यांनी परंपरेला आव्हान दिले आहे. अन्य सत्रांमध्ये अनेक आकर्षक असे विषय होते. जर एक सत्र महिलांच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील शाश्वततेसाठी होते तर दुसरे सत्र हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील महिलांच्या करियर मधील येणार्‍या आव्हानांवर चर्चा करणारे होते. यामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवर दिग्गजांमध्ये आयआयएचएम च्या संचालिका आणि सहसंस्थापिका संजुक्ता बोस आणि पीआयपी २०२० च्या संस्थापिका डॉ. मधु चांडोक यांचा समावेश होता.
आयआयएचएम चे संस्थापक आणि या जागतिक कॉन्फरन्स मागील आधारस्तंभ असलेले डॉ. सुब्रोनो बोस यांनी यावेळी सांगितले “ आजच्या वक्त्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या वक्त्यांचा समावेश होता. युनाटेड नेशन्सच्या थीम ऑफ इंटरनॅशनल विमेन्स डे नुसार डिजिटऑल: इन्नोव्हेन ॲन्ड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वालिटी नुसार आयआयएचएम ने नेहमीच एक चांगला मंच देण्यासाठी शाश्वत असे तंत्रज्ञान देऊ केले आहे, यामध्ये महिलांना आता वेगळ्या क्षेत्रात करियर करुन आंतरराष्ट्ररीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात जोडण्याची संधी प्राप्त झाली आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: