fbpx

जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलमध्ये २५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : नºहे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्तर्फे पाचव्या जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, खो-खो, तायक्वांदो, रिले यांसारख्या सांघिक आणि बुध्दीबळ, धावणे, कराटे यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मराठी, इंग्रजी माध्यमातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेत ज्युनियर केजी ते इयत्ता १० वी व पदविका अभ्यासक्रम शिकणा-या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच संस्थेच्या प्रांगणात विविध खेळांमधील खेळाडूंची माहिती देणारे फलक देखील लावण्यात आले होते.

प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर कला व वाणिज्य महाविद्यालय, शार्दुल सुधाकरराव जाधवर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, पॅराडाईज ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल, जाधवर इंटरनॅशनल स्कूल, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंद्रप्रस्थ, पॅराडाईज किडस्, जाधवर इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ँड ज्युनियर कॉलेज, आदित्य इन्स्टिटयूट आॅफ मॅनेजमेंट, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर विज्ञान महाविद्यालय या संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, मैदानी खेळांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील चांगले राहते. सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थी लहान वयातच डिजिटलाईज होतात. यामुळे मैदानी खेळात ते मागे पडत आहेत. विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहन देण्याकरीता जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: