fbpx

दलीत महिला उद्योगविश्वात यशाचे शिखर गाठू शकतात – पद्मश्री मिलिंद कांबळे

पुणे : दलीत महिला अत्यंत कष्टाळू ,मेहनती ,धाडसी तसेच प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उठवणाऱ्या आहेत .त्यामुळे त्यांनी आता उद्योग क्षेत्रात आल्यास यशाचे शिखर गाठू शकतात आणि तेच यशस्विनी या पुस्तकातून दिसून येत आहे असे मत दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक व आय आय एम जम्मू चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले .

आज जागतिक महीला दिनानिमित्त डीक्की च्या वतीने सिमा कांबळे लिखित यशस्विनी या पुस्तक प्रकाशन समारंभ व महिला सबलीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रंगी पद्मश्री कांबळे बोलत होते .या कार्यक्रमास पद्मश्री मिलिंद कांबळे ,नयना सहस्रबुद्धे, डिक्की चे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रवी नाररा, G 20 चे महाराष्ट्र प्रमुख राजेश पांडे ,रिपब्लिकन युवा मोर्चा च्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे , भारतीय विचार साधना चे उपाध्यक्ष चित्तरंजन भागवत ,अंजली कुमार श्रीवास्तव , डीक्की चे प्रदेशाध्यक्ष मुकुंद कमलाकर , पुणे शहराध्यक्ष राजू साळवे , डिक्की नेक्स्ट जन च्या मैत्रय कांबळे ,अविनाश जगताप , संतोष कांबळे , डीक्की महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा उबाळे ,निवेदिता कांबळे यासह दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या .

पुढे बोलताना कांबळे म्हणाले की ,भारत सरकार विविध योजना व नवे उपक्रम राबवित आहे त्याचा योग्य उपयोग महिलांना करून घ्यावा .तसेच महिलांना व्यवसायात उभे करण्यासाठी डिक्की आपल्या पाठीशी उभे राहून आपला उद्योग उभा करण्यासाठी मोलाची मदत करेल. 

पुस्तकाच्या लेखिका सिमा कांबळे यांनी या पुस्तकातील यशस्वी उद्योजकाचा सर्वांनी आदर्श घ्यावा व नव्या दलीत महिला उद्योग करू पाहणाऱ्यांना हे पुस्तक प्रेरणा देईल असे मत व्यक्त केले. 
नयना सहस्रबुद्धे म्हणाल्या, भारतीय महिला या अतिशय प्रामाणिक व बुद्धिमान आहेत .सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज सर्व बँकाचा कर्ज फेडण्याचा आलेख पाहिल्यास महिला या अतिशय योग्य पद्धतीने कर्ज परत फेड करीत आहेत .आणि महिलांचे नॉन पर्फॉन्स असेट चे प्रमाण अत्यंत कमी आहे .त्यामुळे महिलांना सर्व बँकांचा कर्ज देण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन आहे त्याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा व यशस्वी उद्योजक व्हावे. 

या वेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (भारत सरकार ) व सिडबी यांनी आपल्या विविध योजनांचे सादरीकरण केले .

Leave a Reply

%d bloggers like this: