लक्सो शो या ऊत्कृष्ट फॅशन शो पुण्यात संपन्न झाला
पुणे : गेल्या विकेंड ला पुण्यात इतिहासातील सर्वांत मोठ्या लक्झरी फॅशन शोज पैकी एक असलेल्या ‘दि लक्सो शो (Luxo Show) पुणे एडिशन’ (टीएलएस) चे आयोजन करण्यात आले होते. या शो मध्ये पुण्याच्या इतिहासातील कधीही न पहिलेल्या भारतातील सर्वोत्कृष्ट फॅशन डिझायनर्स नी त्यांचे कलेक्शन पुण्यात दोन दिवस सादर केले. टीएलएस मध्ये लक्झरी ब्रॅन्ड्स, कला, वस्त्रे, फॅशन, संस्कृती आणि परपंरा यांचे सादरीकरण हे वेल्थ मॅनेजमेंट, रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, फाईन ज्वेलरी, लक्झरी फर्निचर, टेक्स्टाईल, फॅशन विभागांत करण्यात आले. दि लक्सो शो पुणे एडिशन मध्ये पुण्यातील दिग्गज कलाकारांबरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, बारामती आणि नागपूर या शहरांतील कलाकारांनी ही भाग घेतला होता.
पुणे, वाराणासी आणि लखनौ मध्ये तीन पर्वांचे आयोजन केल्यानंतर टीएलएस ने केवळ ब्रॅन्डच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एचएनआय आणि यूएचएनआयज साठी सुध्दा विकसनशील बाजारपेठांमध्ये ही आपले नाव कोरले आहे. २०२३ पासून पुढे आता इंदूर, रायपूर, जयपूर, अहमदाबाद, सूरत, रांची, कोची, हैद्राबाद, चंदिगढ, गुवाहटी इत्यादी विकसनशील बाजारपेठेत ही टीएलएस चे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. टीएलएस कडून भागीदार असलेल्या भारतातील आणि परदेशातील विविध लक्झरी ब्रॅन्ड्स ना विशेषकरुन वेल्थ मॅनेजमेंट, रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, लाईफस्टाईल आणि ज्वेलरी, फॅशन, वस्त्रे, होम फर्निशिंग आणि डेकोर, आर्ट आणि कलेक्टेबल्स, हेरिटेज आणि कल्चर, पर्सनल केअर, व्हाईट गुड्स, टेक्नॉलॉजी, ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम, कॉन्सिर्ज सर्व्हिसेस, चार्टर सर्व्हिसेस, ॲक्सेसरीज, घड्याळे, परफ्युम्स आणि अन्य अनेक विभागातील ग्राहकांना अनोखे उपाय उपलब्ध करुन दिले जातातच पण त्याच बरोबर उत्पादन/सेवांच्या प्रसारा बरोबरच कोविड नंतरच्या इंडिया २.० च्या विकसित होणार्या गोष्टीही उपलब्ध करुन दिल्या जातात. दि लक्सो शो पुणे एडिशन चे आयोजन फेब्रुवारी २०२३ मध्ये करण्यात आले होते व हा शो प्रथमच सर्वांत मोठा (६६००० चौरस फूट) आणि लक्झरी तसेच लाईफस्टाईल शो बनला आहे.
लक्झरी जीवन जगण्यास उत्सुक असलेल्या जनतेला टीएलएस कडून सर्वांत मोठे कार्यक्षम व स्थानिक आधारानुसार अनुभव देण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. टीएलएस आता ब्रॅन्ड्सचे प्रदर्शन करणारा मोठा मंच तर आहेच पण त्याच बरोबर त्यांच्या ब्रॅन्ड्स बद्दल स्थानिक बाजारपेठांमध्ये जागरुकता निर्माण करुन पुढील काळात ग्राहकांच्या मागणीत बदल घडवण्यासाठी सक्षम बनला आहे.
शो मधील डिझायनर फॅशन रनवे, ब्रॅन्ड्स चे लाँचेस, पुरस्कार आणि मान्यता या सर्वांना पुण्यातील शाही परिवारातील आणि मान्यवर लोकांची उपस्थिती होती. या वेळी आयोजित रनवे मध्ये प्रतिथयश डिझायनर्स जसे वैशाली एस, सुनीत वर्मा, कामील हेवितरणा (श्रीलंका), अब्राहम ॲन्ड ठाकोर, उर्वशी कौर, मनीष सक्सेना, रिमझिम दादू, आद्यम- आदित्य बिर्ला उपक्रम, श्रृती संचेती आणि रॅप न वेफ्ट बाय सागरिका राय यांचा समावेश होता.
फॅशन आणि लक्झरी मधील सर्वोत्कृष्टता साजरी करण्यासाठी प्रतिथयश ब्रॅन्ड्स जसे रॉल्स रॉयस, फेरारी, जीप, लेक्सस, मर्सिडिज बेंझ, किया, मिनी, लँड रोव्हर, बीएमडब्ल्यू आणि बीएमडब्ल्यू मोटरार्ड यांनी भागीदारी केली होती तसेच दि लक्सो शो मध्ये ज्वेलरी पार्टनर म्हणून तनिष्क आणि राठोड ज्वेलर्स सहभागी झाले होते. शो च्या प्रमुख प्रायोजकांमध्ये नुवामा वेल्थ- पूर्वाश्रमीची एडिलवाईस वेल्थ (टायटल स्पॉन्सर्स), व्हीटीपी रिॲल्टी (प्रेझेंटिंग स्पॉन्सर), सिमेन्स (कोपावर्ड बाय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर कुलिनरी आर्ट्स, दुबई (कोपावर्डबाय) यांचा समावेश असून रुद्राक्ष हे क्युरेटोरियल पार्टनर, प्रसाद बिडापा- शो डायरेक्टर. आशिष भुयान (डिझाईन पार्टनर), टीएलएस पुणे एडिशनच्या अन्य सहकारी ब्रॅन्ड्स मध्ये बॉश, गग्गेनू, ट्रॅव्हलर्स (ट्रॅव्हल पार्टनर्स), लेझ (लाईफस्टाईल पार्टनर), ॲडव्हान्स्ड नेचर , भारती विद्यापीठ (एज्युकेशन पार्टनर), डॅनियल ब्युओर ॲकेडमी (हेअर ॲन्ड मेकअप पार्टनर), फोटोहॉलिक्स, आर्ट२ डे आणि पाईनवूड गोल्फ यांचा सामवेश होता.
शो च्या यशस्वीते विषयी बोलतांना दि लक्सो शो चे संस्थापक श्री प्रवीण कुमार आणि श्री रोहन सिंग यांनी सांगितले “ दि लक्सो शो ला वर्षानुवर्षे मोठे यश मिळत आहे. पुणे आणि आसपाच्या क्षेत्रातील एचएनआय आणि यूएनएचआय लोकांकडून जे सहकार्य मिळाले त्या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आमच्या पुण्यातील भागीदार ब्रॅन्ड्सना सुध्दा त्यांची उत्पादने आणि सेवांसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील लोकांना अधिक सक्षम असा लक्झरी कंटेंट पुढील ही काळात आम्ही नक्की उपलब्ध करुन देऊ शकू.”
नुवामा वेल्थ चे अध्यक्ष आणि प्रमुख राहुल जैन यांनी सांगितले “ लक्सो शो टिम बरोबर सहकार्य करतांना आंम्ही खूपच उत्साही आहोत. अशा आकर्षक शो मुळे प्रत्येक क्षेत्रातील लक्झरी अधोरेखित झाली आहे. टीएलएस हा शो प्रेक्षकांच्या लक्झरी गरजा ओळखण्यासाठी प्रसिध्द असून त्यांना एकाच छताखाली या गरजा पूर्ण होत आहेत. नुवामा वेल्थ हा एक एकात्मिक असा मंच असून या अंतर्गत विविध ग्राहकांना सेवा आणि उपाय उपलब्ध होतात यामध्ये एचएनआयज आणि मोठ्या कॉर्पोरेट्सचा समावेश आहे. म्हणूनच आमच्यासाठी ही नैसर्गिक युती होती. आणि यामुळे ग्राहकांसाठी एक अनोखा समृध्द अनुभव असून त्यांच्या वित्तीय प्रवासासाठी ज्ञानाचा पाया यामुळे तयार झाला आहे.”