fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRA

1000 मुलांच्या वसतिगृहास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या

 

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या कडे मागणी

औरंगाबाद : किलेअर्क येथील 1000 मुलांच्या शासकीय वसतिगृहास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी मागणी आज रिपब्लिकन विद्यार्थी सेना व पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सचिन निकम,गुणरत्न सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची भेट घेऊन करण्यात आली.
ह्यावेळी 1000 वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा सुधारावा,वसतिगृहात अभ्यासिका सुरू करा,वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तात्काळ देण्यात यावा,महात्मा फुले विचार मंचाची डागडुजी करावी,दोन वर्षांपासून बंद वार्षिक स्नेहसंमेलन सुरू करा,कंप्युटर लॅब सुरू करा,व्यायाम शाळा सुरू करा अश्या मागण्या करण्यात आल्या.
वसतिगृहातील समस्या तात्काळ सोडविण्यासाठी विद्यार्थी,विद्यार्थीसंघटना,सर्व गृहपाल, भोजन ठेकेदार,स्वच्छता ठेकेदार यांची संयुक्त बैठक आयोजित करून समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी उपायुक्त सोनकवडे यांनी तात्काळ आदेश दिले.
वसतिगृह नाव देण्याबाबत तात्काळ शासनास प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.
यावेळी रोहन वाकळे, निलेश वाघमारे, विश्वजित गायकवाड, लक्ष्मण डोईफोडे, संदिप सरोदे, विशाल पडघन, आशिष जाधव, नितीन पाईकराव, शुभम नेतने, नयन पवार, सुयोग बनसोडे, राहुल कदम, अक्षय भाग्यवंत, अजय दांडगे, मुकुंद भुक्तर, सुबोध खंदारे, विवेक खंदारे, हर्षवर्धन घनसावध, श्याम साळवे, आकाश बनकर, भावेश कोळसे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: