Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बारावीचा गणिताचा पेपर फुटला: , सरकार काय झोपलय का ? विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले

मुंबई :- बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा… पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायच कसे, सरकार काय झोपलय का ? असा संपप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले. अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून या मागे कोणत रॅकेट कार्यरत आहे का ? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, बारावीचे पेपर सुरु आहेत. आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे गणिताचा पेपर फुटला. गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे. बारावीची परिक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading