Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘सन्मान चित्रतपस्वीचा’ कार्यक्रमात दिग्दर्शक राजदत्त यांचा विशेष सन्मान

पुणे  : गायिका मनिषा निश्चल यांच्या महक या संस्थेच्या ३० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सन्मान चित्रतपस्वीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त ( Director Rajdutt) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. ४ मार्च रोजी सायं. ५ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी गेट सेट गो हॉलीडेज प्रायव्हेट लिमिटेड, पूना गेस्ट हाऊस यांचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असणार आहे.

कार्यक्रमात मुलाखतकार राजेश दामले हे मुलाखतीच्या माध्यमातून राजदत्त यांचा जीवनप्रवास उलगडतील. तर गायिका मनिषा निश्चल, गायक जितेंद्र अभ्यंकर आणि वंडरबॉय पृथ्वीराज हे सह-कलाकारांच्या साथीने राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाजलेली गीते सादर करतील.

याबाबत माहिती देताना मनिषा निश्चल म्हणाल्या, “ अत्यंतिक राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्नांची जाण आणि चित्रपटातून प्रबोधन या त्रिसूत्रीच्या आधारे आपले जीवन जगणारे दिग्दर्शक राजदत्त हे खऱ्या अर्थाने एक चित्रतपस्वी आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याची आमची मनापासून इच्छा होती. यंदा महक या संस्थेला ३० वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्त आम्ही हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्थेच्या माध्यमातून मी गेल्या ३० वर्षात संपुर्ण देशभरात जवळपास ४००० पेक्षा जास्त गायनाचे कार्यक्रम केले आहे.’’

अधिकाधिक कलारसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन देखील मनिषा निश्चल यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading