निवडणूक आयोग चुनाव नाही तर चुना लगाओ आयोग बनला आहे-उद्धव ठाकरे यांची टीका
मुंबई : निवडणूक आयोग (Election Commission)वर आमचा विश्वास नाही. याच निवडणूक आयोगाने आम्हाला एक निर्णय दिला अन् रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला वेगळा निर्णय दिला. हा चुनाव नाही चुना लगाओ आयोग बनला आहे.आता सर्वोच्च न्यायालय हा शिवसेनेसाठी शेवटचा पर्याय आहे. पण हा निर्णय केवळ महाराष्ट्राच नाही तर देशाच भवितव्य ठरवेल, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी केले.
मराठी भाषा गौरवदिना निमित्त आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही. निवडणूक आयोग बोगस आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला चालू असताना निवडणूक आयोगाने चोमडेपणा करण्याची गरज नव्हती. कदाचित विरोधकांना न्यायालयात हार होण्याची भीती असल्याने हा निर्णय देण्यात आला असावा. रामविलास पासवान यांच्या पक्षाचा देखील असाच वाद होता. तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना एक चिन्ह आणि त्यांच्या काकाला वेगळे चिन्ह देण्यात आले होते. मात्र आपल्याकडे तर वेगळाच निर्णय देण्यात आला. आता सर्वोच्च न्यायालय हा शिवसेनेसाठी शेवटचा पर्याय आहे.
ठाकरेंचे संस्कार कसे चोरणार
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चोरदार टीका केली. ते म्हणाले तुम्ही आमचा पक्ष आणि चिन्ह चोरलं. उद्या आमचे आजोबा ही चोरताल. पण आम्हाला चोरण्याची सवय नाही. सगळं चोराल पण ठाकरेंचे संस्कार कसे चोरणार. हिम्मत असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून शिवसेना चालवून दाखवा. तसेच ठाकरे हे नाव काढून पक्ष चालवून दाखवा, असे आव्हाण दिले.
