Monday, September 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

प्रेम व्यक्त करणं होणार आता आणखी सोप्पं! नवीन रोमँटिक गाणं ‘सपान’ आलंय प्रेक्षकांच्या भेटीला!

‘बहिणाबाई’, ‘नाखवा’ नंतर केवल वालंजच्या ‘सपान’ गाण्याची सोशल मीडियावर हवा

‘प्रेम आणि प्रेमाने प्रेमावर वाटणारा विश्वास, मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना…’ या वाक्यासाठी अतिशय योग्य उदाहरण म्हणून एक नवं कोर गाणं प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. ब्रह्मचारी म्हणून आयुष्यभर राहणार असा प्रण घेतलेला तरुण युवक त्याच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी येताच घेतलेले प्रण कसे विसरतो आणि त्या मुलीच्या प्रेमात बेधुंद होऊन कसे रमतो याचे हुबेहूब वर्णन करणारे ‘सपान’ हे रोमँटिक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात दिग्दर्शित आणि ‘स्वप्न स्वरूप’ निर्मित या गाण्यात अभिनेता जिगर मुकेश शाह आणि अभिनेत्री दिव्या गुप्ता ही जोडी पाहायला मिळतेय.

गावरान प्रेमगीत असलेल्या या गाण्यात जिगरचे करावे तितके कौतुक कमीच. पेशाने सीए असणारा जिगर अभिनयापोटी आणि मराठी गाण्यांच्या प्रेमापोटी थेट कॅनडाहून भारतात आला. सीए होण्यासोबतच त्याने अभिनेता होण्याचे इतकी वर्ष उराशी बाळगून ठेवलेले स्वप्नही तो पूर्ण करण्यात यशस्वी झाला आहे. या गाण्यात जिगर आणि दिव्याचा रोमँटिक अंदाज पाहणं रंजक ठरणार आहे. या गावरान प्रेमगीताला आपल्या सर्वांचा लाडका गायक म्हणजेच केवल वालंज याने त्याचा सुमधुर स्वर दिला आहे. तर मराठी गाणी आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात यांनी या गाण्याच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. तर केवल आणि सचिन आंबात यांची याआधी ‘बहिणाबाई’, ‘रूपाचं चांदणं’, ‘रातचांदणं’, ‘नाखवा’ ही गाणी मिलियन व्ह्यूज मिळवून सुपरहिट झाली आहेत. ‘सपान’ या गाण्याला छायाचित्रकार सागर आंबात याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. गावाकडे चित्रित झालेले हे प्रेमगीत चांगलेच नजरेत भरतेय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

एका रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद ‘सपान’ या गाण्यातून ‘स्वप्न स्वरूप’ या युट्युब चॅनेलवर प्रेक्षकांना चाखता येणार आहे. या नव्या जोडीचं हे रोमँटिक सॉंग रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading