Wednesday, May 27, 2026
Latest NewsSports

राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट निवड चाचणी संपन्न, 1 मार्च पासून सुरू होणार पश्चिम विभागीय आंतरराज्यीय स्पर्धा

पुणे :  दिव्यांगांची राज्यस्तरीय क्रिकेट व दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय निवड चाचणी शिबिर निंबाळकर ग्राउंड, शाहू कॉलेज, पुणे या ठिकाणी नुकतीच पार पडली. यावेळी ३० पेक्षा जास्त खेळाडूंनी निवड चाचणीमध्ये सातारा, सोलापूर कोल्हापूर पुणे बीड उस्मानाबाद अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळाडू सहभाग नोंदविला होता.

सदर निवड चाचणी शिबिर हे माजी रणजी खेळाडू मिलिंद गुंजाळ, श्रीकांत काटे व पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन या त्रिस्तरीय निवड चाचणी घेतली. यावेळी इम्तियाज दफेदार, सौरभ रावळिया टुर्नमेंट कमिटी हेड ऑल इंडिया क्रिकेट असो फॉर फिजिकली चॅनेज, शरद सावंत,राजू मुजावर आदी उपस्थित होते. येत्या १ मार्च रोजी पश्चिम विभागीय आंतरराज्यीय स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत १५ खेळाडूंचा संघ निवड करणार आहेत. ही स्पर्धा पुण्यातील नेहरू स्टेडियमवरती पार पडेल.

या स्पर्धेत महाराष्ट्र, मुंबई, गुजरात, सौराष्ट्र, बडोदा असे ५ संघ सहभागी होणार असून ४ दिवस ही स्पर्धा पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उदघाटन पार पडले अशी माहिती दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा सचिव राजू मुजावर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading