एसएसपीयुमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ .रघुनाथ माशेलकर यांचे ‘इनोव्हेशन फॉर ऑल’वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे : जेव्हा आपण इनोव्हेशनचा विचार करतो तेव्हा फक्त तंत्रज्ञानाविषयक इनोव्हेशन चा विचार केला जातो परंतु इनोव्हेशनचा अभ्यास केला असता इनोव्हेशन हे तंत्रज्ञानाविषयक मर्यादित नसून इतर अनेक प्रकारचे इनोव्हेशन जसे कि बिसनेस मॅनेजमेंट इनोव्हेशन, वर्क फ्लो इनोव्हेशन, ऑर्गनायझेशन इनोव्हेशन, रिसर्च प्रोसेस इनोव्हेशन, सिस्टीम इनोव्हेशन अशा अनेक इनोव्हेशनच्या बाबींचा विचार विद्यार्थ्यांनी इनोवेशनचा अभ्यास करताना करायला हवा असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ” इमिनंट स्पिकर्स सिरीज ” या शृंखमालेप्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होतेत्यांनी इनोव्हेशन फॉर ऑल या विषयावर मार्गदर्शन केले. .यावेळेस विद्यापीठाच्या प्र – कुलपती डॉ . स्वाती मुजुमदार , प्रभारी कुलगुरू डॉ . गौरी शिरूरकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. या शृंखमालेच्या पहिल्या सत्रात डॉ. माशेलकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरीत करणारी भारतातील इनोव्हेशनची अनेक उदाहरणे दिली. इनोव्हेशन हे खूप प्रभावशाली असून इनोव्हेशन हे जगाला बदलू शकते आणि यासाठी शिक्षण खूप महत्वपूर्ण ठरते. डॉ.माशेलकर यांनी विद्यापीठातील विविध लॅब्स , स्किल सेंटरला भेट दिली तसेच विद्यापीठात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे अभ्यासक्रम जाणून घेतले व तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच डॉ . माशेलकर यांनी शिक्षण क्षेत्रातील नवा प्रयोग असलेल्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे अभिनंदन केले.
विद्यापीठातील विविध उपक्रमांविषयी माहिती देताना सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ . स्वाती मुजुमदार म्हणाल्या कि एसएसपीयु मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर भर दिला जातो . तसेच विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये सक्षमरित्या काम करण्यासाठी तसेच उत्तम उद्योजक बनविण्यासाठी विद्यापीठात विविध उपक्रम राबविले जातात तसेच इंटरडिसीप्लिनरी सायन्सच्या माध्यमातून अनेक कौशल्ये शिकवली जातात .
ह्या शृंखमालेसाठी इंदोर येथील सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेसचे विद्यार्थी युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून उपस्थित होते
