fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maharashtra HSC board Exam 2023 : बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरूवात झाली आहे. अन् पहिल्याच पेपरच्या प्रश्नपत्रिकेत घोळ झाला असल्याचे उघड झाले आहे. HSC बोर्डाने याची दखल घेतली असून लवकरच याबाबत बैठक घेतली जाईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

आज राज्यभर बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे. आजच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये तीन प्रश्नांपैकी एका प्रश्नात उत्तर दिले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रश्नपत्रिकेत पान क्र. 10 वर प्रश्न क्र. 3 आणि त्यात उपप्रश्न होते ए 3, ए 4 आणि ए 5 हे प्रश्न होते. यामध्ये ए 3 आणि ए 5 मध्ये प्रश्नच दिलेला नव्हता. तर ए4 मध्ये कवितेच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्या खाली उत्तर सुद्धा देण्यात आले होते.

दरम्यान, या घोळाची HSC बोर्डाने दखल घेतली असून या तीन प्रश्नांच्या 6 गुणांबद्दल बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे.

फोटो – संग्रही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading