पुण्यातील गणेशोत्सवासाठी असलेेले स्पीकरचे बंधन दहाही दिवस उठविणार
प्रदूषण मुक्त कसब्यासह जुन्या वाड्यांचा टी.पी.स्किमनुसार विकास करणार :
भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या कसबा मतदारसंघाच्या निर्धारनाम्याचे देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे – पुण्यातील गणेशोत्सवासाठी असलेले स्पीकरचे बंधन दहाही दिवस उठविण्यासोबतच प्रदूषण मुक्त कसबा आणि जुन्या वाड्यांचा टी.पी.स्किमनुसार विकास करण्यासह अनेक आश्वासने असलेल्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या निवडणुक निर्धारनामा आणि कार्य अहवालाचे प्रकाशन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उमेदवार हेमंत रासने, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, खासदार धनंजय महाडिक, मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, धीरज घाटे, राजेश पांडे, गणेश बिडकर, दीलीप कांबळे, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, प्रमोद कोंढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रासने यांच्या निर्धारनाम्यामध्ये नदीसुधारणा प्रकल्पाद्वारे कसब्याचा चेहरामोहरा बदलणार, पुढील तीन महिन्यांत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होणार, मंडईतील भाजी खरेदीचा आणि मध्यवर्ती भागात येऊन खरेदीचा आनंद द्विगुणीत होणार, पार्किंगची कटकट संपणार, प्रदूषणाला चाप बसणार, हवामान बदलामुळे नव्याने उद्भवत असलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी निश्चित आराखडा तयार करून कार्यवाही करणार, क्लिन एअर सिटी प्रकल्पात पुण्याचा समावेश आहे, त्या अनुषंगाने कसब्यातील दाटीवाटीच्या भागातील हवेची गुणवत्ता उंचावण्यासाठी उपाययोजना करणार, शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार, सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, राजेंद्रनगर आणि सानेगुरूजी वसाहत या महापालिका वसाहतीचा पुनर्विकासाचा निर्णय झालेला आहे, तो मार्गी लावणार, शहरातील अस्तित्वात असलेल्या पार्किंग स्पेसेस विशेष मान्यता घेऊन मल्टिस्टोरिड व आधुनिक करणार, शहरातील सुपर हिट ठरलेल्या पुण्यदशम या बससेवेचा विस्तार करणार, कसब्यातील डे्रनेज, वॉटर लाईन, इलेक्ट्रिक लाईन, ऑप्टिकल फायबर, टेलिफोन केबल, रेनवॉटर लाइन यांचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यथायोग्य नियोजन करणार, मतदारसंघातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये प्रतिक्षालय आणि स्वच्छतागृह उभारणार, झोपडीधारकांंच्या घरांसाठी जीपीआरएस सिस्टिम कोड तयार करणार, महानगरपालिका रूग्णालय अत्याधुनिक सुविधांसह सक्षम करणार, घनकचर्याचे चोख व्यवस्थापन करणार, सर्व स्थानिक घटकांना विश्वासात घेऊन महात्मा फुले मंडईचे नव्या गरजांनुसार विकसन करणार, झोडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने राबविण्यासाठी प्राधान्य देणार, महापालिकेच्या वतीने दरवर्षी एकदा लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा केला जातो, तो महिन्यांतून एकदा करणार ,पुण्यात गणेशोत्सवात स्पीकरसाठी असलेले बंधन दहाही दिवस उठवणार, पुण्याहून सुटणार्या लांब पल्ल्याच्या रेल्वेचे नामकरण जय गणेश एक्सप्रेस करण्यासाठी पाठपुरावा करणार, गणेशोत्सवाचा इतिहास साकारणारे आंतरराष्ट्रीय संग्रहालय साकारणार, जुन्या पुण्यासाठी टीपी स्किम राबविणार, स्थानिक मालक, भाडेकरू यांचे विकसित जागेत पुनर्वसन करणार, क्रीडांगणे, व्यायामशाळा, समाजमंदिर, छोटी भाजीपाला केंद्र उभी करणार, मेट्रो स्टेशनमुळे वाढणारी वर्दळ लक्षात घेता मंडई व परिसराचा प्रभावी वापर होण्यासाठी पुनर्विकास गरजेचा, वाढीव गाळे, पार्किंगवर भर
भिडे वाड्याचा पुनर्विकास तातडीने करून फुले दाम्पत्याचे स्मारक करणार, प्राचीन वारसा असलेल्या वास्तू लक्षात घेऊन स्वतंत्र पर्यटन आराखडा निश्चित करणार, हेरिटेज वॉकसाठी विशेष सुविधा निर्माण करणार, कसब्यातील तालमींचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करणार, सणासुदीच्या काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता हा परिसर नो व्हेईकल झोन करण्यासाठी आग्रह धरणार, देवदासी तसेच तृतीयपंथीयांसाठी विशेष आरोग्य केंद्र सुरू करणार, भाजीवाले, फेरीवाले, पथारीवाले या सारङ्घया व्यावसायिकांना व्यावसायिक सुरक्षा पुरविणार, पुनर्वसन करणार, अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी स्वयंरोजगार आणि महिलांसाठी बायोटॉयलेट उभारणार, अशी आश्वासने दिली आहेत.
