Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणेकरांचा बस प्रवास महागला; तब्बल 28 मार्गांच्या तिकीट दरात वाढ

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत डेपो कोअर सिटी मार्गा करिता पाच रुपयांत पाच किमी प्रवास अशी सुविधा देण्यात आली होती. मात्र, यामुळे महामंडळा आर्थिक फटका बसत असून या पार्श्वभूमीवर डेपो कोअर सिटीच्या तब्बल 28 मार्गांवरील बस तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांचा बस प्रवास महागला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळा तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत दि. २५ ऑक्टोबर २० पासून ५ किमी. अंतराकरीता रूपये ५/- तिकीट दर आकारणी करून डेपो कोअर सिटीचे नवीन ५६ मार्गांवर १४३ शेड्युलद्वारे प्रवाशांना बस सुविधा सुरू करणेत आली होती. मात्र, सदरील मार्गांचे उत्पन्न व प्रवासी संख्या विचारात घेता काही मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने काही बसमार्ग बंद करून सध्या २८ मार्गांवर ५१ शेड्युल संचलनात सुरू ठेवण्यात आले आहेत.

सदर मार्गांवरील संचलनातील बसेस करीता प्रत्यक्षात येणारा खर्च व उत्पन्न यांचा विचार करता ५ किमी. अंतराकरीता रूपये ५/- तिकीट दर आकारणी मुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊन पर्यायाने संचलन तूट वाढत आहे. त्यामुळे महामंडळाची संचलन तूट कमी होण्याच्या दृष्टीने रविवार १९ फेब्रुवारी २०२३ पासून सदर डेपो कोअर सिटीचे २८ मार्गांवरील ५१ शेड्युल करीताची तिकीट दर आकारणी इतर सर्वसाधारण मार्गांकरीता सध्या प्रचलित असणाऱ्या तिकीट दर आकारणी नुसार करणेत आली आहे.

तिकीट दरवाढ करण्यात आलेले २८ मार्ग खालीलप्रमाणे –

स्वारगेट –  पुणे स्टेशन ते  ताडीवाला रोड
महात्मा गांधी बसस्थानक पुलगेट ते शितल पेट्रोल पंप

न.ता.वाडी –  डेक्कन ते  गोखलेनगर
डेक्कन ते निलज्योती

कोथरूड –  कोथरूड स्टँड (गुजराथ कॉलनी) ते  कोथरूड स्टँड (वर्तुळ)
गालिंदे पथ ते दांगट वस्ती
कर्वेनगर (गार्डन सिटी) ते  कर्वेनगर (वर्तुळ)
कोथरूड डेपो (बावधन)  ते  कोथरूड डेपो (वर्तुळ)

कात्रज –  कात्रज ते जांभुळवाडी
कात्रज ते  नऱ्हेगांव
कात्रज ते गुजरवाडी
कात्रज ते  येवलेवाडी
कात्रज ते वाघजाईनगर

हडपसर – हडपसर ते सासवड रोड रेल्वे स्टेशन
हडपसर ते महंमदवाडी
हडपसर ते फुरसुंगी
हडपसर ते  मांजरी बु.
हडपसर ते संकेतविहार
मुंढवा चौक ते मांजरी बु.

अप्पर डेपो – मार्केटयार्ड शत्रुंजय मंदिर ते  मार्केटयार्ड (वर्तुळ)
मार्केटयार्ड (सुखसागरनगर) ते  मार्केटयार्ड (वर्तुळ)
कात्रज कोंढवा रोड ते अप्पर डेपो

निगडी –  निगडी ते  रूपीनगर
खंडोबामाळ ते चिखली

भोसरी – भोसरी ते दिघी
चऱ्होली गांव ते आळंदी

पिंपरी – चिंचवड गांव ते वाल्हेकरवाडी

बालेवाडी – चिंचवड गांव ते आकुर्डी रेल्वे स्टेशन

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading