fbpx
Friday, April 26, 2024
BusinessLatest News

यूरोकिड्सची अभ्यासक्रमातील कल्पकतेसाठी आणि व्यवसायांच्या संधींसाठी ओळख

मुंबई : भारतातील पूर्व प्राथमिक शाळांच्या साखळींपैकी एक असलेल्या यूरो किड्स ने या वर्षी अनेक पुरस्कार पटकावले, जसे की:

Asia’s Most Trusted Preschool Brand 2023 – Indo-Global Entrepreneurship Forum 2023

India’s Most Respected Early Childhood Education Brand Dec 22” – Education World;

Best Preschool Education in Asia – Indo-Asian Business Excellence Summit 2022

‘Best Franchisor of the Year 2022’ – Franchise India

‘The Best Education Brands Awards’ – The Economic Times

‘Best Online Children’s Learning’ – Education Innovation Awards 2022

‘Bengaluru’s Best Pre-School for the Year 2022’ – Bengaluru Pride Award for Excellence in Business and many more.

यूरो किड्सला त्याच्या उत्कृष्ट अध्यापनशास्त्र, बालशिक्षणातील त्यांची आवड, व्यावसायिक कुशाग्र बुद्धीमत्ता आणि संपूर्ण भारतात फ्रेंचाइझ व्यवसाय वाढविण्यासाठी पुरस्कृत केले गेले आहे.

यूरो किड्सचा ‘मुले सर्वप्रथम, सुरक्षा सर्वप्रथम’ (‘Child First, Safety First’) या विचारसरणीवर विश्वास आहे आणि म्हणूनच येथे जेव्हा मुले खेळतात, शिकतात, मोठे होतात आणि जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करतात तेव्हा त्यांची वाढ आणि त्यांना गुंतवून ठेवण्याच्या गरजा हे दोन्ही घरासारख्याच वातावरणात एकत्र यावे याची यूरो किड्स पूर्ण खात्री करते.

पारंपरिक अध्यापन मानकांपासून दूर जात यूरो किड्स नावीन्यपूर्ण आणि जागरूक असा अभ्यासक्रम- युनोइआ (EUNOIA) सादर करून लक्ष, लवचिकता आणि दयाळूवृत्ती यांच्यासह एक जागरूक शाळा संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे. यूरो किड्सने मुलांना घरामध्ये सुद्धा सकारात्मक पद्धतीने व्यस्त करण्यासाठी आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षण प्रवासाचा एक भाग म्हणून मदत करण्यासाठी वर्गाच्या चार भिंतींच्या पलिकडील पूरक शिक्षण देण्यासाठी होम बडी अॅप (HomeBuddy app) आणले आहे. होम बडी अॅप (HomeBuddy app) हा सामग्रीचा खजिना आहे. साप्ताहिक शिक्षण योजना, रेकॉर्ड केलेले धडे, शिक्षणाला बळकटी देण्यासाठी परस्पर संवादी खेळ, वर्कशीट्स, स्वतः करा (DIY) असे दृकश्राव्य उपक्रम, यूरो फिट (EUROFIT)आणि योगाकिड्स (YOGAKIDS) व्हिडीओ, माइंडफूल प्लस (MINDFUL+)आणि यूरो म्युझिक (EUROMUSIC) व्हिडीओ, वाचून दाखवलेल्या गोष्टी, थेट (लाइव्ह) वर्ग आणि पालकांसाठी कोपरा यांचा समावेश असलेली ही एक मजेदार जागा आहे.

लाइटहाउस लर्निंग चे पूर्व प्राथमिक गटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के व्ही एस शेषसाई म्हणाले, “यावर्षी आम्ही अनेक पुरस्कार पटकावल्याचा आम्हाला आनंद आहे आणि हा प्रत्येक पुरस्कार आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, फ्रेंचायझी भागीदार आणि कॉर्पोरेट कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मेहनत आणि मुलांचे शिक्षण कधी ही थांबू नये म्हणून त्यांनी केलेले अहोरात्र काम याचेच द्योतक आहे. आमच्या मुलांना २१ व्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी, नावीन्य आणि कल्पकता आणण्यासाठी आणि शैक्षणिक परिणाम समृद्ध करण्यासाठी आम्ही ‘मुले सर्वप्रथम’ या विचारसरणी वर लक्ष केंद्रित करतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading