भारतासाठी भक्कम आर्थिक संकेत :डीएसपी म्युच्युअल फंड
पुणे : जगभरातील आर्थिक पडझडीच्या वातावरणातही भारताने भक्कम आर्थिक वाढीची नोंद केली असल्याचे डीएसपी म्युच्युअल फंडाच्या फेब्रुवारी २०२३ च्या ‘नेत्रा’ या मासिक अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आर्थिक क्षेत्रातील नवीन कल आणि घडामोडींचा मागोवा घेते. भारताचा उच्च वारंवारता निर्देशक मजबूत असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.यामध्ये पोषक असे जीएसटी संकलन , पेट्रोलियम उत्पादनांची झालेली विक्रमी विक्री, इलेक्ट्रॉनिक टोल (फास्टॅगसह) संकलन यांचा यात समावेश आहे. वेगवान आर्थिक तसेच व्यावसायिक घडामोडींसह आर्थिक क्षेत्रात सकारात्मक भावना असल्याचे द्योतक आहे.
एमएससीआय इमर्जिंग मार्केट निर्देशांकातील २६ % तेजीच्या तुलनेत निफ्टी निर्देशांकाच्या अलीकडील सपाट कामगिरीमुळे भारतासारख्या अन्य उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत उच्च मूल्यांकन प्रीमियम नाहीसा झाला आहे. हा एक सकारात्मक घडामोड आहे कारण अलीकडे उच्च मूल्यांकनामुळे भारतातील परकीय चलन कमी झाले होते. पुढील एकत्रीकरण आणि स्थिर उत्पन्न वाढीमुळे आपण २०२३ मध्ये प्रगती करत असताना भारत पुन्हा एकदा आकर्षक बनू शकतो असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डीएसपी म्युच्युअल फंडाच्या दृष्टीने रोखे बाजारात संधी आहे. कारण ज्या ज्या वेळी रिझर्व्ह बँकेने व्याज दर वाढवले त्यावेळी कॉर्पोरेट रोख्यांमध्ये चांगली वाढ झाली . आधीच्या व्याजदर वाढीच्या तुलनेत आताची व्याज दरवाढ जास्त नसल्याने नाणेनिधी धोरण जास्त अडथळा निर्माण करणार नाही. त्याचबरोबर तरलतेची परिस्थिती देखील शेवटच्या वाढीच्या तुलनेत चांगली आहे आणि कॉर्पोरेट प्रसारही खूप जास्त नाहीत. याचा अर्थ कॉर्पोरेशन कठोर चक्रात देखील कर्ज घेऊ शकतात आणि दर देखील अधिक अनुकूल आहेत.हे दीर्घकालीन दृष्टीकोनातून भारताच्या वाढीस मदत करेल.
चांगली वाढ साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्र सज्ज आहे. बँक समभागांमधील सध्याची घट ही कर्ज देणाऱ्यांना कर्जदार जोडण्याची आणखी एक चांगली संधी आहे. उत्पन्न वक्र खूप जास्त तीव्र होते आणि रिझर्व्ह बँक व्याज दरवाढीच्या विचारात असतानाच एनएसई बँक निर्देशांक आणि एनएसई धातू निर्देशांकाचे गुणोत्तर निम्न स्तरावर आले आहे. बँक समभाग किमतीमधील अलीकडीची सुधारणा आणि धातू समभागांमध्ये आलेली तेजी पुन्हा एकदा आकर्षक संधी देत आहे.वाहन क्षेत्रातही खूप आशादायक व्हीलर दिसत आहे असा डीएसपी म्युच्युअल फंडाचा विश्वास आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दीर्घकालीन उत्पन्नाचा असलेला आकर्षक मार्ग कायम राहील. तंत्रज्ञान क्षेत्रातीलचांगले मूल्यांकन आणि किंमत सुधारणा अशा वातावरणाची वाट बघत असलेल्या गुंतवणूकदारांना खरेदी करण्याची चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे.
“उत्पन्नातील वाढ आणि मूल्यमापन मृदू होणे ही २०२३ मध्ये समभाग बाजारपेठेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे . गेल्या १७ महिन्यांतील मजबुतीकरणामुळे अनेक मूल्यांकनाचा फेस काढला . या पार्श्वभूमीवरही बाजाराची आगेकूच कायम राहील”, असा अंदाज डीएसपी म्युच्युअल फंडाचे विपणन धोरणकार आणि उत्पादन प्रमुख साहिल कपूर यांनी व्यक्त केला.
