मुथूट फिनकॉर्पने सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी ‘व्यापारी मित्र’ हे तारणमुक्त दैनिक हफ्ते कर्ज सुरू केले
कोची : भारताचा आर्थिक विकास हा लाखों किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींभोवती फिरतो हे काही गुपित नाही. अशा व्यावसायिकांना व्यवसाय सुधारणेसाठी वित्त पुरवठा आणि कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यवसायाच्या वाढीस मदत करण्यासाठी मुथूट फिनकॉर्प‘व्यापार मित्र बिझनेस लोन’ हे नवीन व खास तयार केलेले सानुकूल असे उत्पादन घेऊन येत आहे.
‘व्यापार मित्र बिझनेस लोन’ च्या सहाय्याने व्यापारी, व्यवसाय मालक आणि स्वयंरोजगार उद्योजक कोणतेही अतिरिक्त तारण न ठेवता त्यांच्या दैनंदिन रोख प्रवाहावर आधारित व्यवसाय कर्ज घेऊ शकतात. व्यापारी मित्र व्यवसाय कर्ज आयकर रिटर्न पेपर शिवाय आणि सीबील स्कोर (CIBIL) च्या आधीच्या नोंदीशिवाय मिळू शकते आणि हेच वैशिष्ट्य व्यापारी मित्राला बाजारपेठेत वेगळे बनवते. जे दुकानमालक दैनंदिन उत्पन्न मिळवतात त्यांना दैनंदिन परतफेडीच्या पर्यायाचा फायदा होऊ शकतो, त्यांच्या व्याजाचा प्रवाह कमी होतो ज्यामुळे व्यापार मित्र बँकेच्या कर्जा पेक्षा अधिक आकर्षक बनतो. कोणतेही प्रि-पेमेंट शुल्क नाही, वर्षातून तीनदा कर्जाचे नूतनीकारण करता येण्याची सोय, साधे-सुलभ आणि जलद दस्तऐवजीकरण आणि कर्जाचे जलद वितरण यांसारखे फायदेसुद्धा या नवीन उत्पादनामध्ये आहेत. व्यापार मित्र हे १५ फेब्रुवारी २०२३ रोजी बाजारात येणार असून देशभरातली ३६०० हून अधिक मुथूट फिनकॉर्प शाखांमध्ये ते उपलब्ध असेल.
मुथूट फिनकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाजी वर्गीस म्हणाले, “मुथूट फिनकॉर्प नेहमीच देशातील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि बँक अकाऊंट नसलेल्यांना मुथूट फिनकॉर्प लिमिटेड द्वारे औपचारिक बँकिंग क्षेत्रात पहिला प्रवेश मिळवून देण्यासाठी उभे राहिले आहे. हे एक सानुकूल (कस्टम मेड) उत्पादन आहे, जे विशिष्ट ग्राहकांच्या, खास करून दैनंदीन उत्पन्न मिळवणाऱ्या गटासाठी, विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानुसार बनवले आहे आणि यावेळी आम्हाला हे देशातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी करायचे आहे, जे आमची अर्थव्यवस्था चैतन्यशील ठेवतात. मला आशा आहे की ‘व्यापार मित्र’ देशातील किरकोळ व्यापारी आणि दुकानदारांना सक्षम बनवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”
मुथूट फिनकॉर्प ने विकसित केलेल्या ‘व्यापार मित्र’ या अजून एका ग्राहककेंद्रित सोल्यूशनने १३६ वर्षांपेक्षा अधिक काळ लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या मुथूट फिनकॉर्पच्या मुकूटात एक अजून सोनेरी पंख खोवले आहे. मुथूट फिनकॉर्पच्या सहानुभूतीपूर्ण आणि विचारशील उत्पादनांची नेहमीच प्रशंसा केली जाते. व्यापार मित्र हे यापेक्षा वेगळे नाही. हे केवळ प्रत्येक व्यवसाय विभागासाठी त्यांच्या विशिष्ट गरजा आणि आवश्यकता लक्षात घेऊन तयार केलेले आहे.
देशातील आघाडीची सोन्यावर कर्ज आणि एमएसएमई कर्ज देणारी एनबीएफसीपैकी एक, मुथूट फिनकॉर्प लिमिटेड ही मुथूट पप्पाचन समूहाची एक महत्त्वाची कंपनी आहे. वर्षानुवर्षे मुथूट फिनकॉर्प लिमिटेड या विश्वासावर आधारित संस्थेने कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केंद्रस्थानी ठेऊन बनवलेली उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी दिली आहे. दररोज १,२५,००० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा पुरवीत मुथूट पप्पाचन समूहाने आर्थिक सेवा, पर्यटन, वाहतूक, बांधकाम क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, आंतरराष्ट्रीय सेवा आणि पर्यायी ऊर्जा यांसह अनेक क्षेत्रांमध्ये आपली छाप निर्माण केली आहे.
