Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

हा बहुमताचा विजय : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : बाळासाहेब ठाकरे, आंनद दिघे, शिवसैनिका व लोकशाहीचा हा विजय आहे. कायद्यानुसार आम्हाला शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत असून मेरीटवर हा निर्णय झाला असल्याची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला दिलासा दिला आहे. शिवसेना नाव व धन्युष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा धक्का मानला जात आहे. या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचे ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून या निर्णयाचे स्वागत केले आहे. मी घेतलेल्या निर्णयानंतर माझ्याबरोबर आलेल्या आमदार व खासदार यांचा हा विजय आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असते आणि ते बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळेच हा निर्णय झाला आहे, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading