Wednesday, May 27, 2026
Latest NewsPUNE

निवडणूक निरीक्षक एस.सत्यनारायण यांची मतदान केंद्रांना भेट

पुणे : जिल्ह्यातील २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन केंद्रांची तपासणी केली आणि मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आवश्यक सुविधा आणि रचना याबाबत संबंधित अधिकारी आणि समन्वयकांना मार्गदर्शन केले.

मागील निवडणुकीत कमी संख्येने मतदान झालेल्या भागात विशेष मोहिम राबवून मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष पोरेडी, समन्वयक थॉमस नरोन्हा, उत्तम भारती, अशोक कुटे यांच्यासह संबंधीत समन्वय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मामुर्डी येथील सेंट जॉर्ज इंग्लिश मिडीयम स्कूल, किवळे येथील विद्या भुवन स्कूल, विकासनगर, भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळा आणि दिवंगत मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, पुनावळे येथील महापालिका शाळा, चिंचवडगाव येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा आणि मरहूम फकिरभाई पानसरे उर्दू विद्यालय, थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल व महापालिका शाळा तसेच जी.के. गुरुकुल, पिंपळे निलख येथील महापालिका शाळा, पिंपळे गुरव येथील महापालिका शाळा आणि विशालनगर येथील विद्याविनय निकेतन शाळा या मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षकांनी भेटी दिल्या. त्यांनी मतदान केंद्राची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी तेथील व्यवस्थेबाबत चर्चा केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading