Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

श्यामल करंडक एकपात्री स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी 11 महिलांची निवड

पुणे : ज्येष्ठ एकपात्री कलावंत सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ केवळ महिलांसाठी आयोजित केलेल्या श्यामल करंडक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अकरा स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. अंतिम स्पर्धा शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी निळू फुले कला अकादमी येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 36 स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अनघा बुरसे, नीलिमा पाठक, भावना प्रसादे, गंगा मेश्राम, भाग्यश्री वाळवेकर, विनिता दंडारे, प्रिया विरवे, केतकी पांडे, जान्हवी मोरे-पाटील, निशा शेलार, सारिका वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ कलावंत अरुण पटवर्धन आणि दिपाली निरगुडकर यांनी केले.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांच्या हस्ते झाले. या वेळी सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर, एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्रचे अध्यक्ष दीपक रेगे, निळू फुले कला अकादमीचे विश्वस्त सुरेश देखमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सभारंभ शनिवार, दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता नृत्यगुरू पंडिता मनिषा साठे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सुंठणकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम निळू फुले कला अकादमी, शास्त्री रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या व्यासपीठावर मनमोकळेपणाने व्यक्त व्हा, अशा शब्दात दिपाली शेळके यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका अनुजा कुलकर्णी यांनी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गपचुप यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading