सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने जल्लोष
सातारा :छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलेल्या राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन व मोर्चे ही काडण्यात आले होते. पुणे शहरे व गाव बंद ठेवण्यात आले होते. त्याच बरोबर राज्यपाल कोशारी यांचा आज राजीनामा राष्ट्रपती यांच्या कडे सुपूर्त केला असून संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष ऍड,मनोज दादा अखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक (सातारा जिल्हा संपर्क प्रमुख) संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांच्या कडून नागरिकांना साखर वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
जय जिजाऊ… जय शिवराय…!! संभाजी ब्रिगेड जिंदाबाद… आशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रफीक शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तेजस्विनी केसरकर व सातारा शहर अध्यक्ष सचिन जाधव, जिल्हा संघटक मलंग नदाफ, तालुकाध्यक्ष आशिष खवळे, कार्यअध्यक्ष महेबूब पठाण, सचिव राजेंद्र तांगडे, शहर संघटक इम्रान कच्छी, जिल्हा सल्लागार दशरत, युवा कार्याध्यक्ष, तुषार कांबळे, ओमर ओमकार चव्हाण,शाबाज शेख, निकम, महिलाआघाडी सल्लागार ऍड, वनिता भोसले पाटील, शहर अध्यक्ष सुजाता शिवशिखरे, उप संघटक पूनम परमार,युवाअध्यक्ष पूजा सावंत, जिल्हा चित्रपट आघाडी अनिता चव्हाण, उपाध्यक्ष उज्वला निकम, संतोषी माने इत्यादी उपस्थित होते.
राज्यपालांच्या हकालपट्टीचे जोरदार अभिनंदन – संभाजी ब्रिगेड
शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झाली. राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांनी राज्यपालांचा राजीनामा मंजूर करून तमाम शिवप्रेमींच्या भावनांचा आदर केला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपालांची हकालपट्टी झाल्याबद्दल सर्व शिवप्रेमींचे मी अभिनंदन करतो.
महाराष्ट्रातून राज्यपालांची हकालपट्टी व्हावी म्हणून तमाम जाती धर्माच्या पुणेकरांच्या वतीने आम्ही ‘पुणे बंद’ केलं होतं. त्या तमाम पुणेकरांचा आज विजय झाला…
