.. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदींच्या मागे उभे राहिले – उद्धव ठाकरे
मुंबई : जेव्हा भाजपचे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. तेव्हा राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी कशाचीही परवा न करता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले, असे उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, प्रियंका चतुर्वेदी, सुनील प्रभू आदी उपस्थित होते. या प्रसंगी ठाकरे यांनी हिंदी व मराठीमध्ये उत्तर भारतीयांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी महाविकास आघाडीत गेलो, याचा अर्थ मी हिंदुत्व सोडलं असा होत नाही. एकमेकांना दुसऱ्यांशी लढवत ठेवायचं, ऐकमेकांचा द्वेष करायचा हे आमचं हिंदुत्व नाही. 1995च्या आधी जेव्हा भाजप – शिवसेनेची युती होती तेव्हा भारतीय राजकारणात आम्ही अस्पृश्य समजले जात होतो. आशा काळात नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ आली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा बचाव केला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी कशाचीही पर्वा केली नाही. अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान होते. तेव्हा त्यांनी राजाधर्माचे पालन करावेच लागेल ही म्हटंले होते. पण तेव्हा जर राजाधर्माचे पालन केले असते तर आज मोदी पंतप्रधान नसते.
यावेळी भाषा कोणतीही असु दे दिल मिलने चाहिये, असे म्हणत आता मन की बात नको, दिलकी बात हवी, असा टोला ही ठाकरे यांनी पंतप्रधानांना लगावला.
