Thursday, September 17, 2026
Latest NewsLIFESTYLE

बार्बेक्यू नेशन तर्फे पुण्यातील सिंहगड रोडवर नवीन आऊटलेटची सुरुवात

पुणे –  आपल्या सध्याच्या वाढीच्या योजनेचा एक भाग म्हणून बार्बेक्यू नेशन या आघाडीच्या रेस्तराँ चेन तर्फे पुण्यातील ग्रॅन्ड होराझयन, माणिक बाग, सिंहगड रोड येथे आपल्या १० व्या आऊटलेटची सुरुवात केली.  ६,५०० चौरस फूटांवर पसरलेल्या या आऊटलेट मध्ये १३० पाहूण्यांची बसण्याची सोय आहे.  कॉर्पोरेट लाँचेस आणि पारिवारीक भेटींसाठी हे एक योग्य स्थळ आहे.  बार्बेक्यू नेशन ही भारतातील आघाडीची कॅज्युअल डायनिंग चेन असून त्यांनी प्रथमच लाईव्ह ऑन द टेबल ग्रिलिंग संकल्पना सुरु केली.

यावेळी बोलतांना बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री फैज आझिम यांनी सांगितले “ पुण्यातील ग्रॅन्ड होराझन, माणिक बाग, सिंहगड रोड पुणे येथे नवीन आऊटलेट सुरु करण्याची घोषणा करतांना आंम्हाला आनंद होत आहे.  बार्बेक्यू नेशन मध्ये आम्ही सर्वोत्कृष्ट आदरातिथ्य आणि सेवा आमच्या ग्राहकांना देण्यासह विविध पदार्थां बरोबरच आकर्षक अंतर्गत सजावट उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द आहोत.”

दि इट ऑल यू  कॅन बुफे  पध्दती नुसार बार्बेक्यू नेशन कडून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल उपलब्ध करुन देण्यात येते.  मांसाहारी स्टार्टर्स मध्ये प्रसिध्द मेक्सिकन चिली गार्लिक फिश, हॉट गार्लिक चिकन विंग्ज, तंदूरी तंगडी, काजून सीक कबाब, कोस्टल बार्बेक्यू प्रॉन्स आणि अशा अनेक पदार्थांचा समावेश असून शाकाहारी स्टार्टर्स् मध्ये तोंडाला पाणी सूटेल असे कुटी मिर्च का पनीर टिक्का, वॉक टॉस्ड सीक कबाब, शबनम के मोती मशरुम, पुरी कबाब आणि हनी सीसम सिनमॉन पायनॅपल तसेच अन्य पदार्थ उपलब्ध असतील.  मांसाहारी पदार्थांच्या मेन कोर्स मध्ये चिकन दम बिर्याणी, राजस्थानी लाल मांस आणि दम का मुर्ग, तर शाकाहारी पदार्थांमध्ये पनीर बटर मसाला, मेथी मटर मलाई, दाल ए दम आणि व्हेज दम बिर्याणी यांचा समावेश आहे.  लाईव्ह काऊंटर वर विविध शाकाहारी/मांसाहारी पर्याय असून यांत चिली क्रिस्पी पुरी, पालक चाट, मार्गारेटा पिझ्झा, खीमा पाव आणि चिकन शीक यांचा समावेश आहे.  तर डेझर्ट मध्ये चॉकलेट ब्राऊनी, रेड वेल्व्हेट पेस्ट्रीज, अंगुरी गुलाबजामुन, केसरी फिरनी आणि विविध प्रकारच्या कुल्फी ही या रेस्तराँ मध्ये असून त्यामुळे पाहुण्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading