Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

मी आपल्या परिवाराचाच एक सदस्य; पंतप्रधानांचा बोहरा मुस्लिम समाजाशी भावनिक संवाद

मुंबई : मी या परिवाराच्या चार पिढ्यांशी जोडलो गेलोय. खूप कमी लोकांना हे भाग्य मिळतं. मी इथे पंतप्रधान म्हणून नाही आलोय, मी आपल्या परिवाराचाच एक सदस्य आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोहरा मुस्लिम समाजाशी संवाद साधला.   

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंधेरीतील मरोळ येथील अल – जामिया – तूस – सैफिया या बोहरा मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक संकुलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी बोलत होते. यावेळी आयोजकांकडून पंतप्रधान मोदी यांचा अनेकदा पंतप्रधान म्हणून उल्लेख केला गेला. त्यावर मोदी यांनी मी तुमच्याच परिवाराचाच एक सदस्य आहे, असे म्हटंले.  

मोदी म्हणाले, “बोहरा समाजाचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहिले आहे. त्यामुळेच अधिवेशन चालू असतानाही मी कार्यक्रमाला आलो. वेळेनुसार परिवर्तन आणि विकासाच्या कसोटीवर नेहमी त्यांनी स्वत:ला सिद्ध केलंय. आज अल जमिया सारख्या शिक्षण संस्थाचा विस्तार ही याचाच एक जिवंत उदाहरण आहे. महिलांच्या शैक्षणिक क्षेत्रातही या समाजाचे मोठे योगदान आहे. या संस्थेच्या रूपाने दीडशे वर्षापूर्वीचं स्वप्न साकार झाल आहे. “मी सहेदना साहेब यांना सहज भेटण्यासाठी गेलो होते. ते वयाच्या 99 व्या वर्षी मुलांना शिकवत होते. माझ्या मनाला ती घटना आजही प्रेरित करते, ही आठवण देखील सांगितली. 

पुढे बोलताना मोदी म्हणाले, कोणत्याही देशात इंडस्ट्रियल इको सिस्टिम आणि शैक्षणिक व्यवस्था खूप महत्त्वाची असते. विकासा बरोबर विरासत देखील महत्त्वाची आहे. त्यामुळेच भारत परंपरे सोबत आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक प्रणालीत स्थानिक भाषांना स्थान दिल गेलाय. तसेच शाळांमध्ये स्किल टेचोलॉजीचे शिक्षण दिले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading