संभाजी ब्रिगेडने फोडला प्रचाराचा नारळ
पुणे : विधानसभेच्या कसबा आणि चिंचवड मतदार संघ पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेड’ने जिजाऊंना अभिवादन करून, कसबा गणपतीचे दर्शन घेत अधिकृत उमेदवार अविनाश मोहिते यांच्या प्रचाराचा नारळ फोडला…
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उत्तम कामठे, प्रकाश जाधव, संदीप कारेकर, महादेव मातेरे, स्मिता म्हस्कर, सुरेखा जूसगर, संध्या शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चिंचवड मतदार संघातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार प्रवीण कदम यांचाही प्रचाराचा नारळ फोडला.
कितीही दबाव आला तरी कसबा संभाजी ब्रिगेड लढणार…! – संतोष शिंदे
संभाजी ब्रिगेड कसबा पोटनिवडणूक लढवणार आहे. म्हणून तर अधिकृत उमेदवार म्हणून अविनाश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्ष दबाव टाकत आहेत. मात्र संभाजी ब्रिगेड कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व महासचिव या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच कसबा व चिंचवड मतदार संघात संभाजी ब्रिगेडचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ‘आम्ही मागे हटणार नाही.’ वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब योग्य तो निर्णय घेतील. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, कसबा विधानसभा व चिंचवड विधानसभा ही निवडणूक लढवण्यात येणार आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मावळे आहोत, आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही…
