Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष द्या-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ आणि २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पोलीस उपायुक्त आर. राजा, संदीप सिंह गिल, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्ट्रॉंगरूमची तयारी, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी केंद्राची व्यवस्था, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, ईव्हीएमसाठी मतपत्रिका मुद्रण, पोस्टल मतदान आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

ते म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील यावर विशेष लक्ष द्यावे. ईव्हीएम यंत्र निर्धारित स्थळी नेताना जीपीएस प्रणाली असलेल्या वाहनांचा उपयोग करावा आणि या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करावे. दोन्ही मतदारसंघात निर्धारित वेळापत्रकानुसार प्रशिक्षणाचे आयोजन करावे.

यापूर्वीच्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदान केंद्र परिसरात मतदार जागृतीचे उपक्रम राबवावे. मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे. मतमोजणी केंद्रावरील आवश्यक सुविधांचे आतापासूनच नियोजन करावे. दिव्यांग मतदारांसाठी अधिक संख्येने व्हीलचेअरची व्यवस्था आणि त्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading