Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी आज उमेदवार जाहीर होणार -चंद्रकांत पाटील

पुणे:आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड सर्वानीच जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून कसबा निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करत आहे. परंतु विरोधी पक्षांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यातच भाजपनेही बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात आज भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली आणि या पोटनिवडणुकांसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होणार असल्याचे पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. आहे.

पाटील म्हणाले, येत्या ६ फेब्रुवारीला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही खूप ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहोत. ही परंपरागत जागा आहे. मात्र, निवडणुकीत कधीही धोका पत्करण्याचा नसतो. गाफील राहायचे नसते. आम्ही सगळे सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स करण्याची इच्छा आहे. सर्वांनी आमच्याप्रमाणे सर्व जागा जिंकण्याचा दावा केला. मात्र, कोकणची जागा आम्ही आठ हजारांच्या मतांनी जिंकली. नाशिकमध्ये काय झाले माहिती आहे. मतांचे बाद प्रमाण होण्याचे प्रमाण मोठे आहे. अमरावतीमध्ये ४ हजार मते बाद झाल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading