Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सीडीके ग्लोबलने त्यांच्या ८ व्या कौटूंबिक दिन कार्यक्रम- कन्वर्जन्स २०२३  मध्ये त्यांचा आजवरचा प्रवास साजरा केला

पुणे : ऑटोमोटिव्ह आणि संबंधित उद्योगांमधील डीलरशिप आणि ओइएमसाठी क्लाउड आधारित सॉफ्टवेअरचे अग्रगण्य प्रदाता सीडीके ग्लोबल आयएनसी (CDK Global Inc) ने आज पुण्यातील लक्ष्मी लॉन्स येथे आपला ८ वा कौटूंबिक दिन कार्यक्रम- ‘कन्वर्जन्स २०२३’ साजरा केला. या वर्षी कन्वर्जन्स या कार्यक्रमाची थीम ‘सेलिब्रेटिंग द जर्नी’ अशी होती, जी सीडीके कर्मचार्‍यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे. संस्थेच्या विकासात आणि यशात सीडीके कुटुंबाच्या योगदानाची ओळख करून देणे आणि त्यांचे कौतुक करणे हे वर्षानुवर्षे कन्वर्जन्सचे प्राथमिक लक्ष्य आहे.

    कन्वर्जन्स २०२३ ची सुरुवात स्वादिष्ट अशा हाय-टी आणि कार्निव्हलने झाली. त्यानंतर कंपनीतील तरुणांचे महत्व अधोरेखित व्हावे म्हणून सीडीके इंडियाच्या सर्वात तरुण सदस्याच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. नंतर कन्वर्जन्स चे खरे चैतन्य दाखविणारा एक व्हिडिओ लावण्यात आला ज्याने प्रेक्षकांना गुंगवून ठेवले. सीडीके ग्लोबल इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  अरविंद चतुर्वेदी यांच्या स्वागत सुचनेने सांस्कृतिक संध्याकाळचे उद्घाटन झाले.

    संपूर्ण कार्यक्रमात प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे मनोरंजनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतींनी सादर करण्यात आले आणि त्याची सुरुवात सीडीकेच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या गणेश वंदनेने झाली. कार्यक्रमाची थीम ‘सेलिब्रेटिंग द जर्नी’ ही एका सृजनात्मक नाटुकली च्या रूपात दाखवण्यात आली होती. ज्याची सुरुवात एका मुलीच्या जन्मापासून झाली; जे कर्मचार्‍यांनी कराओके  च्या सादरीकरणातून दाखवले. हे नाटक संगीत आणि नृत्य सादरीकरणाचे एक  परिपूर्ण मिश्रण बनले ज्याद्वारे मुलीचे संगोपन, तिचे शालेय व महाविद्यालयीन जीवन, सीडीके कर्मचारी म्हणून तिने आपली कारकीर्द सुरू करणे आणि वास्तविक जगात एक ओळख निर्माण होणे या गोष्टींचे चित्रण केले गेले. ते अत्यंत आकर्षक आणि प्रभावी पद्धतीने दाखविले गेले; जे प्रेक्षकांनी पसंत ही केले. सूत्रसंचालकाने नेहमीप्रमाणे गमतीदार गोष्टी, थट्टा मस्करी आणि विडंबनात्मक अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले ज्याचे प्रेक्षकांनी फार कौतुक केले.

    या कार्यक्रमात बहुप्रतिक्षित पारितोषिक वितरण समारंभाचा ही समावेश होता. जिथे सीडीके ग्लोबल इंडियाने आपल्या कर्मचार्‍यांची बांधिलकी, अमर्याद प्रयत्न आणि विविध स्तरांवरील उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन त्यांना सायलंट स्टार, स्पार्क, द्रोणाचार्य आणि यू मेक ए डिफरन्स सारखे पुरस्कार प्रदान केले. विजेत्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या प्रेमळ उपस्थितीत चषक देऊन गौरविण्यात आले.

    लीडर्सचे सादरीकरण हा कार्यक्रमाचा अत्यंत जल्लोषाचा भाग होता. सीडीके ग्लोबल इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरविंद चतुर्वेदी यांचे मनमोहक सादरीकरण ही या संध्याकाळची सर्वात वाखणण्याजोगी आणि मोहक कामगिरी होती, जिथे त्यांनी त्यांच्या काही आवडत्या गाण्यांमध्ये प्रेक्षकांना गुंगवून टाकले.

    त्यानंतर सीडीके अनप्लग्ड या कंपनीच्याच इन् हाऊस बॅंडने केलेल्या सादरीकरणाने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आणि त्यानंतर झालेल्या फॅशनशो ने प्रेक्षकांचा उत्साह अजून वाढवला. हे फॅशन शो संपूर्ण भारतातील विविध विधी आणि संस्कृतींचे परिपूर्ण प्रदर्शन होते. सीडीके कुटुंबियांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही संध्याकाळ एक अविस्मरणीय व जगावेगळे अनुभव बनले.

    ही नाटूकली नृत्य सादरीकरणामध्ये एकत्रित करून सादर केली गेली जिचा विषय क्षण साजरे करणे हा होता. एक संस्था म्हणून सीडीकेने आपल्या कर्मचार्‍यांचे कार्य जीवन सुलभ करण्यासाठी कसे समर्पित प्रयत्न करते हे दाखविण्याचा या सादरीकरणाचा केंद्रबिंदु होता. आपल्या कर्मचारींसाठी वेगवेगळ्या लाभदायक योजना आणि उपक्रमांद्वारे सीडीके निश्चितपणे संपूर्ण प्रयत्न करते की आपल्या कर्मचार्‍यांचे  आरोग्य आणि निरोगीपणाला प्राधान्य दिले जावे आणि आपल्या कर्मचार्‍यांना कौटूंबिक जीवन व कार्यालयीन जीवन यात  योग्य संतुलन साधता येऊन उत्तम कार्य जीवन अनुभवता यावे आणि हेच या नाटुकलीमधून उत्कृष्टपणे दाखविले आहे.

    या ‘गाला नाइट’ची सांगता एका मनोरंजक डीजे ने सुप्रसिद्ध सुपर हिट  गाणी लावून केली, ज्या गाण्यांच्या ठेक्यावर प्रेक्षकांनी नृत्याचा ताल धरला आणि डांस फ्लोर दणाणून टाकले. जल्लोषात साजर्‍या झालेल्या या कार्यक्रमाची सांगता शानदार भोजनाने झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading