fbpx

न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग उद्यापासून

महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजन: स्पर्धेचे ६ वे वर्ष

पुणे : महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबाॅल लीग स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. दिनांक २६ ते २९ जानेवारी दरम्यान गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल माॅल मधील फुटबाॅल ग्राऊंडवर ही स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून खेळाडू फुटबाॅल लीग मध्ये सहभागी होणार आहेत.

स्पर्धेत २९ संघ सहभागी झाले असून २०० पेक्षा अधिक खेळाडू खेळणार आहेत. स्पर्धेचे उद्धाटन २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र विद्या प्रचारक मंडलच्या सचिव सुशीला राठी उपस्थित राहणार आहेत. मुबंई, सांगली, नागपूर, अमरावती यांसह महाराष्ट्रातील विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार आहेत.

साखळी पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक वयोगटात विजेता आणि उपविजेत्या ट्राॅफीज देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. न्याती ग्रुप हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत तर पूर्णार्थ अॅडव्हायझर हे सहप्रायोजक आहेत. १८ वर्षापुढील पुरुष गट, ११ ते १८ वर्षामधील मुले, ७ ते ११ वर्षांमधील मुले, १० ते १६ आणि १६ वर्षांपुढील मुली या वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: