fbpx

हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, इव्हानो इलेव्हन संघांची विजयाची हॅट्रीक !!

पुणे :  पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि इव्हानो इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयाची हॅट्रीक नोंदविली.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत संदीप शिंदे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने न्युट्रीलिशियस् संघाचा ६८ धावांनी पराभव केला. हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २० षटकात १९० धावांचे आव्हान उभे केले. स्वप्निल फुलपगार (४३ धावा), अमेय श्रीखंडे (४४ धावा), संदीप शिंदे (२१ धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्युट्रीलिशियस् संघाचा डाव १२२ धावांवर आटोपला. हेमंत पाटील संघाच्या क्षितीज कबीर (३-१२), संदीप शिंदे (३-२४) आणि हरी सावंत (२-२३) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला.

शुभम हरकाल याच्या १२५ धावांच्या खेळीच्या जोरावर इव्हानो इलेव्हन संघाने वालेकर स्पोर्ट्स संघाचा १४१ धावांनी पराभव केला. इव्हानो इलेव्हनने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२४ धावांचा डोंगर उभा केला. शुभम हरकाल याने ७१ चेंडूत १९ चौकार आणि ५ षटकारांसह १२५ धावा चोपल्या. निखील जोशी याने नाबाद ६५ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ८२ चेंडूत १६१ धावांची भागिदारी करून संघाला विशाल धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानापुढे वालेकर स्पोर्ट्सचा डाव ८३ धावांवर गडगडला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १९० धावा (स्वप्निल फुलपगार ४३, अमेय श्रीखंडे ४४, हरी सावंत २३, ऋतुराज धुलगुडे २६, संदीप शिंदे २१, वैभव विभुते २-२२) वि.वि. न्युट्रीलिशियस्ः १८.१ षटकात १० गडी बाद १२२ धावा (हृषीकेश राऊत ३३, आत्मन पोरे १८, क्षितीज कबीर ३-१२, संदीप शिंदे ३-२४, हरी सावंत २-२३); सामनावीरः संदीप शिंदे;

इव्हानो इलेव्हनः २० षटकात २ गडी बाद २२४ धावा (शुभम हरकाल १२५ (७१, १९ चौकार, ५ षटकार), निखील जोशी नाबाद ६५ (३४, ७ चौकार, ३ षटकार);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी शुभम आणि निखील १६१ (८२) वि.वि. वालेकर स्पोर्ट्सः २० षटकात ८ गडी बाद ८३ धावा (स्वराज फाळके ३६, सागर सिंग ३-२३, अजिंक्य थेटे २-९); सामनावीरः शुभम हरकाल;

Leave a Reply

%d bloggers like this: