fbpx
Friday, December 8, 2023
BusinessLatest News

होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने सादर केली नवी ऍडव्हान्स्ड ऍक्टिवा २०२३

नवी दिल्ली : स्कुटर विभागातील निर्विवाद लीडर होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने भारतातील दुचाकी उद्योगक्षेत्रात एक नवा इतिहास घडवला आहे. या कंपनीने आपली अधिक जास्त स्मार्ट आणि प्रगत ऍक्टिवा २०२३ आज सादर केली.  ही होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाची पहिली ओबीडी२ कम्प्लायंट दुचाकी आहे. एप्रिल २०२३ मध्ये लॉन्च करण्याचे ठरवलेली ही गाडी जानेवारी २०२३ मध्ये दाखल करून कंपनीने आपल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

नवी, अधिक स्मार्ट ऍक्टिवा २०२३ लॉन्च करताना, होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर, प्रेसिडेंट आणि सीईओ श्री. आत्सुशी ओगाता म्हणाले, “ऍक्टिवाने स्कुटरच्या बाजारपेठेत नवचेतना निर्माण केली आणि गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून सर्वाधिक विक्री असलेल्या दुचाकींमध्ये आपले स्थान कायम राखले आहे.  ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ऍक्टिवामध्ये आजवर अनेक बदल करण्यात आले आहेत आणि आज आम्ही आमची नवी ओबीडी२ कम्प्लायंट ऍक्टिवा २०२३ सादर करत आहोत. ऍक्टिवा २०२३ मध्ये अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत जी या श्रेणीत पहिल्यांदाच आणली जात आहेत, आमच्या ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करावे हा आमचा उद्देश आहे.”

ऍक्टिवा २०२३ च्या लॉन्चबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंग विभागाचे ऑपरेटिंग ऑफिसर योगेश माथूर यांनी सांगितले, “नवनवीन प्रगत तंत्रज्ञान सादर करण्यात नेहमी आघाडीवर असणाऱ्या होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने आपल्या ग्राहकांना दैनंदिन जीवनात सुविधा आणि आराम प्रदान करून नेहमी आनंदी ठेवले आहे. याआधी देखील होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने अनेक नवनवीन तंत्रज्ञान सादर केले आहे, एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञान, डबल लीड एक्स्टर्नल फ्युएल ओपनिंग सिस्टिम आणि कॉम्बी ब्रेक सिस्टिम (सीबीएस) यासारख्या अनेक उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे. आता पुन्हा एकदा आम्ही या विभागात दुचाकीसाठी पहिल्यांदा सादर करण्यात येत असलेले तंत्रज्ञान वैशिष्ट्य होंडा स्मार्ट की ऍक्टिवा २०२३ मध्ये घेऊन आलो आहोत.”

स्मार्ट सुविधा

नवीन प्रगत आणि अधिक स्मार्ट ऍक्टिवा २०२३ मध्ये जगभरात नावाजण्यात आलेली होंडा स्मार्ट की’ आहे.  होंडा स्मार्ट की सिस्टिममध्ये पुढील वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

१.  स्मार्ट फाईंड: स्मार्ट कीमध्ये आन्सर बॅक सिस्टिम आहे जी गाडी कुठे आहे हे सहजपणे शोधून देऊ शकते. होंडा स्मार्ट कीवरील आन्सर बॅक बटन दाबल्यावर सर्व ४ विंकर्स दोनदा ब्लिंक होतात आणि स्कुटर कुठे आहे ते लगेच समजते.

२.  स्मार्ट अनलॉक: स्मार्ट की सिस्टिम हे नवे तंत्रज्ञान आहे ज्याच्या साहाय्याने फिजिकल की न वापरता गाडी लॉक व अनलॉक करता येते.  ऍक्टिव्हेशननंतर २० सेकंद काहीच हालचाल झाली नाही असे जर सिस्टिमच्या लक्षात आले तर स्कुटर आपोआप डिऍक्टिव्हेट होते.

३.  स्मार्ट स्टार्ट: जर स्मार्ट की गाडीपासून २ मीटर अंतराच्या आत असेल तर रायडर एलओसी मोडवरील नॉब इग्निशन पोझिशनला फिरवून गाडी अगदी सहजपणे सुरु करू शकतो आणि चावी हातात देखील न घेता स्टार्ट बटन दाबू शकतो.

४.  स्मार्ट सेफ: ऍक्टिवा २०२३ मध्ये मॅप्ड स्मार्ट ईसीयु आहे जो ईसीयु आणि स्मार्ट की यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक मॅचिंग (आयडी) करून सिक्युरिटी डिव्हाईस म्हणून काम करतो. त्यामुळे गाडी चोरीला जाण्यापासून रक्षण होते. स्मार्ट कीमध्ये एक इममोबिलायजर सिस्टिम आहे जी नॉन-रजिस्टर्ड चावीला इंजिन सुरु करण्यापासून रोखते. स्मार्ट कीसोबत सुरक्षित कनेक्शन झाले नाही तर इममोबिलायजर सिस्टिम सुरु होत नाही.

इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच: दोन कामे करू शकणारा स्विच जेव्हा खाली प्रेस केला जातो तेव्हा इंजिन सुरु होते आणि वर प्रेस केल्यावर इंजिन थांबते.

यामध्ये अनोखी डबल लीड फ्युएल ओपनिंग सिस्टिम आहे, याच्या साहाय्याने सीटच्या खाली असलेल्या १८ लिटर स्टोरेजपर्यंत पोहोचता येते, रायडरसाठी ही खूप मोठी सुविधा आहे. याला लॉक मोड आहे (फाईव्ह इन वन लॉक) ज्यामुळे रायडर अतिशय सुरळीतपणे आणि पूर्णपणे विश्वासाने गाडी सांभाळू शकतो.

फ्लोर स्पेस खूप प्रशस्त असल्याने लांबवरचा प्रवास देखील खूप आरामात करता येतो शिवाय आधीपेक्षा जास्त सामान वाहून नेता येते. याशिवाय व्हीलबेस मोठा आहे, खराब रस्त्यांवरून जाताना देखील स्थिरता व संतुलन चांगले मिळते. डीसी एलईडी हेडलॅम्प** सतत इल्युमिनेट होत असल्याने रात्रीच्या वेळी खराब रस्त्यांवरून आणि कमी वेगाने जाताना खूप मदत होते. पासिंग स्विचमुळे हाय बीम/लो बीम नियंत्रणाची आणि एकाच स्विचवरुन सिग्नल पास करण्याची सुविधा मिळते.

स्मार्ट डिझाईन

या स्कुटरला स्टायलिश व स्मार्ट लूक्स देणारे नवे अलॉय व्हील्स ऍक्टिवा २०२३ ची स्टाईल वाढवतात. प्रीमियम रंग आणि थ्रीडी एम्ब्लेमबरोबरीनेच अतिशय आकर्षक व कायम नवे वाटणारे डिझाईन यामुळे या स्कुटरमध्ये प्रगत व अपस्केल इमेज यांचा मिलाप साधला गेला आहे. आधुनिक कट्स असलेले फ्रंट डिझाईन क्रोम एलिमेंट्सना साजेसे आहे, आकर्षक हेड लॅम्प्स स्टाईल स्टेटमेंट वाढवतात. नजर खिळवून ठेवेल असे सिल्वर ग्रॅबरेल आणि अतिशय अनोखे डिझाईन असलेला रियर टेल लॅम्प, साईड विंकर्स स्कुटरच्या एकंदरीत डिझाईनला एक वेगळी उंची प्रदान करतात.

अधिक स्मार्ट विश्वसनीयता

सर्व बाजूंनी संपूर्ण मेटल बॉडी असल्याने विश्वसनीयता आणि टिकाऊपणाचे वचन पुरेपूर पाळले जाते. ऍक्टिवा २०२३ वरील प्रत्येक राईड आरामदायी व सुविधाजनक असते कारण यामध्ये इक्वलायजरसोबत कॉम्बी-ब्रेक सिस्टिम आणि ३-स्टेप ऍडजस्टेबल रियर सस्पेन्शन आहे. १२ इंचांचे फ्रंट व्हील रायडरचा आत्मविश्वास आणि राईडची गुणवत्ता अधिक चांगली होते. टेलिस्कोपिक सस्पेन्शनमुळे श्रेणीतील सर्वोत्तम ग्राउंड क्लियरन्ससह अतिशय आत्मविश्वासपूर्ण व सुरळीत राईडचा अनुभव घेता येतो.

स्मार्ट तंत्रज्ञान

भारतीयांची सर्वात लाडकी दुचाकी होंडा ऍक्टिवा २०२३ ही ५ पेटंट ऍप्लिकेशन्ससह विकसित करण्यात आली आहे.

ओबीडी२ कम्प्लायंट असलेले, होंडाचे विश्वसनीय ११० सीसी पीजीएम-एफआय इंजिन ऍक्टिवा २०२३ मध्ये असून एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) मुळे त्याला प्रोत्साहन मिळते.

अत्याधुनिक, अचूक आणि संवेदनशील एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर अर्थात ईएसपीने भारताला जागतिक स्टँडर्ड्सच्या बरोबरीला आणले आहे. इंजिनचा प्रभाव वाढवणारे होंडा एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर तंत्रज्ञान कार्यक्षम कंबश्चन जास्तीत जास्त करून आणि घर्षण कमीत कमी करून अतिशय शांतपणे स्टार्ट व सहजपणे चालणाऱ्या पर्यावरणस्नेही इंजिनसह एनर्जी आउटपुट वाढवते.

एन्हान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

१.    अनोखे होंडा एसीजी स्टार्टर: करंट निर्माण करण्यासाठी आणि गाडी सुरु असताना बॅटरी चार्ज करण्यासाठी जो एसी जनरेटर वापरला जातो त्यामार्फत इंजिन जोल्ट फ्री सुरु होते. यामुळे स्टार्टर मोटरची आवश्यकता भासत नाही त्यामुळे गीयर मेशींग आवाज नसतात.

यामध्ये दोन मेकॅनिकल वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे इंजिन कमी प्रयत्नांत सुरु होते – पहिले म्हणजे थोड्याशा उघड्या एक्झॉस्ट व्हॉल्वसह डीकॉम्प्रेशनचा कार्यक्षम वापर (कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला) व दुसरे आहे स्विंग बॅक जे इंजिनला थोड्या विरुद्ध दिशेला फिरवते, ज्यामुळे पिस्टनला रनिंग स्टार्ट घेता येतो, अगदी थोडी पॉवर वापरून इंजिन सुरु करणे सोपे बनते.

स्टार्ट सोलेनॉइड ऑटोमॅटिक चोक सिस्टिमप्रमाणे काम करते ज्यामुळे हवा व इंधनाचे मिश्रण चांगले होते आणि कोणत्याही वेळी गाडी पहिल्या प्रयत्नात पटकन सुरु होते.

१.          प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम-एफआय): विशिष्ट इंजिन डेटा आणि ५ इंटेलिजंट सेंसर्सकडून सतत मिळणाऱ्या फीडबॅकनुसार हे सिलिंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन इंजेक्ट करते. यामुळे संपूर्ण वेळ सुरळीत आणि लिनियर पॉवर आउटपुट मिळत राहतो.

२.          टम्बल फ्लो: होंडाने एकीकृत डायकास्टिंग प्रक्रियेमार्फत जगातील पहिले टम्बल फ्लो तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रगत स्मार्ट टम्बल तंत्रज्ञान इनलेट पोर्ट शेपला ऑप्टिमाइज करून आणि रिव्हर्स फ्लोचा वापर करून, अतिरिक्त भाग न जोडता टम्बल फ्लो निर्माण करते, ज्यामुळे कंबश्चन सुधारते.

३.          घर्षण कमी होते: ऑफसेट सिलिंडर, योग्य वजनाचे क्रांकशाफ्ट आणि ऑप्टिमाइज्ड पिस्टनमुळे इंजिनचे एकंदरीत घर्षण कमी होते.  वजन ऑप्टिमाइज्ड असल्याने इंधन कार्यक्षमता सुधारते.

नवीन ऍक्टिवा २०२३ मध्ये फ्युएल इफिशियंट टायर्स आहेत जे होंडाने नवीन टायर कंपाउंड तंत्रज्ञानाने विशेष विकसित केले आहेत. यामध्ये रोलिंग रेसिस्टन्स १५ ते २०% नी कमी होतो पण रस्त्यावरील पकड कायम राहते, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता वाढते.

इंजिन इन्हिबिटरसह साईड स्टॅन्ड*** जेव्हा साईड स्टॅन्ड एंगेज्ड असतो तेव्हा इंजिन स्टार्ट होण्यापासून रोखले जाते, ज्यामुळे तुम्हाला सुविधाजनक आणि चिंतामुक्त राईडचा अनुभव घेता येतो.

किंमतप्रकार आणि रंग:

ऍक्टिवा २०२३ मध्ये स्टॅंडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट हे तीन प्रकार व रंगांचे सहा पर्याय (पर्ल सिरेन ब्ल्यू NEW, डिसेन्ट ब्ल्यू मेटॅलिक, रेबेल रेड मेटॅलिक, ब्लॅक, पर्ल प्रेशियस व्हाईट आणि मॅट ऍक्सिस ग्रे मेटॅलिक) उपलब्ध आहेत.

२०२३ ऍक्टिवा प्रकार व किमती
प्रकार स्टॅंडर्ड डिलक्स स्मार्ट
किंमत(एक्स-शोरूम, दिल्ली) Rs. 74,536 Rs. 77,036 Rs. 80,537

Leave a Reply

%d