Pune – ‘पठाण’चे पोस्टर फाडले
पुणे : शाहरुख खानचा विवादित चित्रपट ‘पठाण’ हा येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वीच बराच गोंधळ निर्माण झाला आहे. या चित्रपटातील गाण्याला विरोध झाला आणि आता तो विरोध वाढू लागला आहे. पुण्यातही ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले.
दरम्यान एकीकडे ‘पठाण’ चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगला भारतात दमदार प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे अजूनही ब-याच संघटना हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाविरोधात प्रदर्शने केली आहेत. शाहरुखचे आणि चित्रपटाचे पोस्टरही जाळण्यात आले.
आता या प्रकरणाचे पडसाद पुण्यातही दिसत आहे. पुण्यातही ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले. पुण्यातील राहुल टॉकीज बाहेर लावण्यात आलेले पठाण सिनेमाचे पोस्टर बजरंग दलने फाडलो. शाहरुख खानच्या काही चाहत्यांच्या ग्रुप ने चित्रपटगृहाबाहेर त्याच्या चित्रपटाचं भले मोठे पोस्टर लावले होते. बजरंग दलाकडून राहुल टॉकीज च्या चालकांना इशारा देऊन हे पोस्टर काढण्याची विनंती केली.
त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये अंदोलकाने असे पोस्टर लावु नये असा इशारा दिला. ‘पठाण’ चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, त्याचबरोबर थेटर मालकांना असे पोस्टर लावू नये अशी विनंती केली आहे. जोरदार घोषणाबाजी करत ‘पठाण’चं पोस्टर फाडण्यात आलं.
‘पठाण’ २५ जानेवारीला रिलीज होत आहे आणि सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी ‘पठाण’ तगडी कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.