आणखी एक अभिनेत्री आणि क्रिकेटरची जोडी अडकली विवाहबंधनात; पहा आथिया – के एल राहूलच्या लग्नाचे फोटो
बॉलीवुड आणि क्रिकेटचे खूप जूने नाते आहे. शर्मिला टागोर – मनसूर आली खान पतोडी, विराट कोहली – अनुष्का शर्मा, हराजन सिंग – गीता बसरा नंतर आता बाॅलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी यांची कन्या आणि अभिनेत्री आथिया शेट्टी व क्रिकेटर केएल राहुल हे लग्न बंधनात अडकले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. आज अखेर ते विवाह बंधनात अडकले. या विवाहाची जास्त चर्चा होवू न देता आज खंडाळा येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आथिया आणि केएल राहुल यांचा विवाह सोहळा पार पडला.
या दिमाखदार विवाह सोहळ्यासाठी बाॅलिवूडच्या अनेक स्टारर्स हजेरी लावली होती. यामध्ये विराट कोहली, अनुष्का शर्मा, सलमान खान, अक्षय कुमार, ईशांत शर्मा, एम एस धोनी, शाहरूख खान आणि केएल राहुल याचे अत्यंत जवळचे काही मित्र उपस्थित होते.