fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

डाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक

प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे १०००० लोकांना रोजगार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार संपन्न

डाव्होस  : स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

श्री. सामंत म्हणाले, आज डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती श्री. सामंत यांनी सांगितली.

यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य कारारा बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
१. Greenko energy Projects Pvt.Ltd १२००० कोटींची गुंतवणूक
२. Berkshire Hathaway Home Services Orenda India १६००० कोटींची गुंतवणूक
३. ICP Investments/ Indus Capital १६००० कोटींची गुंतवणूक
४. Rukhi foods ४८० कोटींची गुंतवणूक
५. Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading