आज परभणी येथून भव्य धम्म पदयात्रा चैत्यभूमी कडे होणार प्रस्थान
– थायलंड येथील 110 भिक्खूचा सहभाग
परभणी : देशात पहिल्यांदाच थायलंड येथील 110 भिक्खुच्या उपस्थितीत परभणी ते चैत्यभूमी दादर, ऐतिहासिक भव्य धम्म पदयात्रा प्रस्थान सोहळा मंगळवारी (दि.17) सकाळी 11.30 वाजता ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान जिंतूर रोड परभणी येथे पार पडणार आहे. या निमित्त बुद्धांच्या अस्थीकलशाचे दर्शन होणार असून, भिक्खूची धम्मदेशना होणार आहे.
या धम्म पदयात्रा सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे.
धम्म पदयात्रेचे उदघाटन भंते लाँगफुजी (जागतिक बौद्ध धम्म गुरु थायलंड) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून भंते सोंगसेन फॅटफियन (थायलंड) ,भंते विचीयन अबोत (श्रीराजगिर) थायलंड , भंते डॉ.उपगुप्त महाथेरो पूर्णा,( महासचिव अ.भा.भिक्खू संघ.महाराष्ट्र), विशेष उपस्थिती म्हणून उपा.डॉ.भिमराव आंबेडकर ,(राष्ट्रीय कार्याध्यक्ष, बौद्ध महासभा),सिने अभिनेता गगन मलिक, कॅप्टन नटकिट (थायलंड) , सिरीलक मैथाई (थायलंड) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.सुरेशराव वरपुडकर पाथरी , आ.डॉ.राहुल पाटील परभणी, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.मेघनाताई साकोरे – बोर्डीकर, आ.रत्नाकर गुट्टे, माजी खा.गणेशराव दुधगावकर , माजी आ.विजय भांबळे जिंतूर, अॅड. अशोक सोनी, माजी महापौर अनिताताई रविंद्र सोनकांबळे, जिल्हाधिकारी आंचल गोयल, सीईओ विनय मून, पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांची उपस्थिती राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व धम्म अनुयायानी धम्म पदयात्रेत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मुख्य समन्वयक लोकनेते विजय वाकोडे, डॉ.सिद्धार्थ भालेराव , प्रकाश कांबळे ,डॉ.प्रकाश डाके ,डॉ.भगवान धूतमल , भिमराव शिंगाडे ,प्रा.डॉ.भिमराव खाडे ,भगवान जगताप ,प्रा.डॉ संजय जाधव , प्रा.डॉ. सुनिल तुरुकमाने, राजेश रणखांब, पंकज खेडकर , सुधिर कांबळे, मंचक खंदारे आदींनी केले आहे.
