fbpx

‘बदलते मेळघाट’ प्रदर्शनात पुणेकरांना अनुभवता येणार मेळघाट येथील आदिवासी संस्कृती


पुणे : मेळघाट येथील आदिवासी कला व संस्कृती पुणेकरांसमोर यावी, त्यांच्या जीवनाचे विविध पैलू शहरी नागरिकांसमोर उलगडावेत या उद्देशाने पुण्यातील मेळघाट सपोर्ट गृप आणि अमनोरा येस फाउंडेशन यांच्या वतीने येत्या शनिवार दि. २१ जानेवारी ते गुरुवार दि. २६ जानेवारी दरम्यान ‘बदलते मेळघाट’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील अमनोरा मॉलच्या वेस्ट ब्लॉक या ठिकाणी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन होणार असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील आदिवासी बांधवांनी बांबूपासून बनविलेल्या दैनंदिन वापरातील व शोभेच्या विविध वस्तू या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार असून याबरोबरच आदिवासी बांधवांनी बनविलेले दागिने, ते पिकवित असलेली सेंद्रिय धान्ये, मध यांचा समावेश देखील या प्रदर्शनामध्ये असणार आहे.

मेळघाट सपोर्ट गृप गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यासारख्या शहरांमध्ये मेळघाटातील कोरकू, पारधी, भिल्ल आदिवासींचे काम पोहोचविण्याचे व त्यांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. ‘बदलते मेळघाट’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: