Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अंगणवाड्या बळकट करण्यावर शासनाचा भर : मंगलप्रभात लोढा

 

५० अंगणवाड्या दत्तक देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार

मुंबई, दि.११: लोकसहभागातून अंगणवाडी केंद्रे बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. अंगणवाडी केंद्र दत्तक देवून अंगणवाडी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्यामध्ये आज झालेला सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत 50 अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या आहेत. या अंगणवाड्यांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.मंत्रालय दालन येथे आज अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघद्वारे संचालित जनकल्याण समिती यांच्यामध्ये एक सामंजस्य करार (एमओयू)

करण्यात आला त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.एकात्मिक बालविकास च्या आयुक्त रुबल अग्रवाल, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव वि.रा.ठाकूर,अवर सचिव श्री.खान, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजित मराठे, युनायटेड वे मुंबईचे अनिल परमार, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे जय कुमार जैन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टचे जयराम शेट्टी,भव्यता फाऊंडेशनचे कुनिक मणियार, लयन्स क्लब ऑफ जुहूचे अंकित अजमेरा उपस्थित होते.मंत्री श्री.लोढा म्हणाले,या करारानुसार पुढील १० वर्षांसाठी दत्तक घेतल्या आहेत. जनकल्याण समिती मुंबईतील १२ अंगणवाड्या, युनायटेड वें मुंबई कर्जत मधील वीस अंगणवाड्या, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वडाळा मधील तीन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट यांनी पश्चिम उपनगर येथील पाच, भव्यता फाउंडेशन यांनी मुंबई उपनगर घाटकोपर येथील पाच अंगणवाड्या, लायन्स क्लब ऑफ जुहू यांनी मुंबई उपनगरातील पाच अशा ग्रामीण व शहरी मिळून ५० अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.

दत्तक घेतलेल्या कालावधीत या अंगणवाड्यांचे नूतनीकरण, रंगकाम, फर्निचर देणगी, क्षमता वाढ, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची जबाबदारी देखील जनकल्याण समिती द्वारे घेण्यात येणार आहे.अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी 9082269044 या नंबर वर संपर्क साधावा असे ही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले, राज्यातील प्रत्येक माता निरोगी राहून, लहान बालक सुपोषित ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे.सक्षम राज्य निर्मिती होण्याकरिता अंगणवाडी केंद्र दत्तक घेणे ही शासनाची अतिशय नावीन्यपूर्ण संकल्पना आहे.या संकल्पनेला सर्वांनी पुढे नेण्यासाठी चला अंगणवाडी दत्तक धोरणाला हातभार लावूया व महाराष्ट्र राज्याला एक सक्षम व सुदृढ पिढी देवूया असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक एकात्मिक बालविकास च्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले. त्यावेळी श्रीमती अग्र वाल म्हणाल्या, राज्यात एक लाख दहा हजार अंगणवाडी असून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्यांना स्मार्ट सुविधा देण्यात येतात. याव्यतिरिक्त उर्वरित अंगणवाड्यांना अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत विकास करण्यासाठी हे धोरण राबवण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading