fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

भारतातील सर्वात कमी 400 ग्राम वजनाचे बाळ पुण्यात जन्मले

पुणे : भारतातील सर्वात कमी 400 ग्राम वजनाचे बाळ पुण्यात जन्मले असून; डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांती या बाळाला वाचवण्यात यश आले आहे. अन् तब्बल 94 दिवसांच्या मुक्कामानंतर 2130 ग्रॅम वजनाच्या निरोगी बाळाला घरी सोडण्यात आले आहे. 

बेबी अंजली (नाव बदलले आहे) हिचा 21 मे 2022 रोजी चिंचवड, पुणे येथील नर्सिंग होममध्ये अकाली जन्म झाला, तेव्हा ती केवळ 400 ग्रॅम वजनाची आणि 30 सेमी लांबीची होती. अकाली जन्म झाल्यामुळे उद्भवू शकणार्या आरोग्यविषयक गुंतागुंत समजून घेऊनही, बाळाच्या पालकांनी बाळाला वाचविण्याचा निर्धार केला आणि बाळाला, वाकड येथील, सूर्या मदर आणि चाइल्ड सुपर या विशेष रुग्णालयातील, तिसर्‍या स्तराच्या एनआयसीयू सेटअपमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. नवजात तज्ज्ञ आणि नवजात अतिदक्षता विभागाच्या एनआयसीयू परिचारिकांच्या टीमने बाळाच्या जन्माच्या काही तासांतच प्रसूतीगृहातून, त्यांच्या छप्ब्न् मध्ये बाळाला आणले. बाळाच्या अपूर्ण वाढ असलेल्या अवयवांचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते, ज्यासाठी बाळाच्या जीवितासाठी, कृत्रिम आधाराची आवश्यकता होती. बाळाचे वजन केवळ 400 ग्रॅम असल्याने, अवयवांच्या मदतीसाठी उपलब्ध उपकरणांमध्ये सूर्या हॉस्पिटलमधील निओनॅटोलॉजिस्टच्या तज्ज्ञ टीमने बाळाचे वजन आणि त्याच्या नाजूक त्वचेला अनुसरून आवश्यक ते बदल केले. तसेच ट्यूबच्या आकाराची खात्री करून, प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या नलिका, कॅथेटर इत्यादींचा सुयोग्य वापर केल्याने, बाळाला कोणतीही हानी झाली नाही.

सध्या आरोग्य सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या जीवनावश्यक तंत्र आणि पायाभूत सुविधा, ह्या मोठ्या आकाराच्या बाळांना आधार देण्यासाठी बनविलेल्या असून अकाली जन्मलेल्या बाळांसाठी अनुकूल नसल्याने हे, क मोठे कठीण आव्हान होते.
हे प्रकरण या रुग्णालयातील आणि देशातील पहिलेच सर्वात अनोखे प्रकरण आहे, ज्यामध्ये, गर्भधारणेचा काळ, बाळाचे वजन, अपरिपक्व अवयव आणि श्वासोच्छवासाची समस्या, दीर्घकालीन फुफ्फुसाचा आजार, ऍनेमिया, तसेच अकाली जन्मामुळे उद्भवणारा श्‍वासोच्छवासास अडथळा आणि डोळ्यांच्या समस्या, यांसारख्या बाळावर परिणाम करणार्‍या अनेक गंभीर समस्या, ज्यामुळे वैद्यकीय टीमचे काम आणखी कठीण झाले होते.

डॉ. सचिन शाह (संचालक दृ नवजात आणि बालरोग अतिदक्षता सेवा) यांनी सांगितले की, भारतात रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा आणि उपकरणे ही 40 आठवडे किंवा त्याहून अधिक काळाच्या योग्य गर्भधारणेच्या कालावधीत जन्मलेल्या बाळांसाठी तयार केली जातात. त्यामुळे, अकाली प्रसूतीच्या प्रकरणांमध्ये, उपचारांची दिशा ,क आव्हान बनते, तर अशा प्रकारच्या गंभीर प्रकरणांमधून शिकण्याची संधी दडलेली असते. गेल्या 10 वर्षांत आम्ही 400 मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांना घरी पाठवले आहे. 

डॉ. मदन गोपाल (वरिष्ठ सल्लागार, आरोग्यद्ध नीति आयोग) म्हणाले, पुण्यातील सूर्या हॉस्पिटल्सच्या टीमने अकाली प्रसूत झालेल्या बाळांच्या व्यपस्थापनात मिळवलेले यश हे आरोग्य सुविधांच्या क्षमतांमध्ये झालेल्या सुधारणा आणि व्यवस्थापनात व्यावसायिकांच्या विकसित क्षमतेचे , आनंददायक प्रतिबिंब आहे. सामान्यतः, सध्याच्या उपलब्ध आरोग्यसेवा सुविधा, जीवन वाचवणारी तंत्रे आणि पायाभूत सुविधा मोठ्या आकाराच्या बाळांना आधार देण्यासाठी तयार केल्या जातात आणि लहान आकाराच्या बाळांसाठी त्या नसतात, म्हणून या प्रकरणात उचलेली पाऊले ही अधिक महत्त्वाची ठरतात. अत्यंत नाजूक अवस्थेत जन्मलेल्या बाळाला वाचवणे ही केवळ सूर्या हॉस्पिटलसाठी अभिमानाची बाब नाही, तर सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसा. तसेच महाराष्ट्र राज्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

बाळाची वेळेवर वैद्यकीय काळजी सुनिश्रि्चत करण्यात सक्रिय सहभाग असलेले हॉस्पिटलच्या बालरोग टीममधील सदस्य, नवजात शिशु अतिदक्षता तज्ज्ञ दृ डॉ. अमिता कौल, डॉ. जयंत खंदारे आणि डॉ. गणेश शिवरकर, डॉ. दीपक सिंग, परिचारिका टीममधील रजनी लोंढे, स्वप्नाली कापरे, शोभा डोंगरे आणि निकिता खेकरे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading