अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना स्वराजरक्षक स्टिकर्सचे वाटप
पुणे : काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. भाजपने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आज अजित पवार यांचा पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला .
राष्ट्रवादी कॉँग्रेस कडून वाहनांसाठी स्वराज रक्षक स्टिकर्सचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे त्या स्टिकर्सवर छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणता येणार नाही. तर ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान केलं होत. त्यानंतर राज्यात चांगलाच गदारोळ माजला, राजीनाम्याची मागणीदेखील करण्यात आली. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला अजित पवार म्हणाले,यावेळी पवार यांनी बारामतीला जाणार असल्याचे सांगितले. आम्ही काम करतो, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देतो. आम्ही पहिल्यापासून पुरोगामी विचार मांडणारे आहो. राष्ट्रवादी कॉंग्रेस जरी वेगळी झाली असली तरी विचार एकच आहेत. जे काही संस्कार केले आहेत. त्यातून पुढे जातो.
प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी मांडलेली भूमिका चुकीचं हे तुम्ही ठरवणारे कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर विचारले असता, पवार म्हणाले, त्यांनी काय म्हणाव हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी गुन्हा दाखल करावा. जीवात जीव असेपर्यंत आमच्याकडून द्रोह होणार नाही. कुणाच्या भावना दुखावणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य राकारण्यांनी करावं. असे अजित पवार म्हणाले.
