fbpx

 काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष स्थापना ते भारत जोडो यात्रा छायाचित्र प्रदर्शन.

पुणे : येत्या २८ डिसेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापनदिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवनच्या पटांगणावर ‘‘छायाचित्र प्रदर्शन’’ चे उद्‌घाटन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनात ॲड. अभय छाजेड यांनी सांगितले की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते मा. राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रेपर्यंत १३७ वर्षांच्या काळातील काँग्रेस पक्षाने केलेल्या कार्याचे छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात १८८५ ते १९४७ पर्यंत स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्वाच्या घडामोडी, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान झालेले पं. जवाहरलाल नेहरू, स्व. लालबहाद्दूर शास्त्री, स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी, स्व. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग यांच्या कालखंडातील देशहितासाठी व देशाच्या उन्नतीसाठी झालेल्या कार्यांचा अहवाल व भारत जोडो यात्रेतील विविध प्रसंग छायाचित्रांद्वारे दाखविला आहे.

भारत जोडो यात्रेत वेगवेगळ्या प्रसंगाचे अनुभव आला. त्यातील विशेष उल्लेख जळगाव जामुद येथे एक महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढत होती तिला विचारले असता तिने फक्त राहुल गांधींची यात्रा असे उत्तर दिले तसेच एक शेतकरी वडिल आपल्या लहान मुलाला घेवून यात्रेत सहभागी झाला त्याला विचारले असता ते म्हणाले माझ्या मुलाने त्याच्या आयुष्यात चांगल्या लोकांना भेटले पाहिजे आणि राहुल गांधी चांगला माणूस आहे जो द्वेषाच्या राजकारणाला प्रेमाने हरवू शकतो, या उद्देशाने ही साडेतीन हजार कि. मी. ची न भूतो न भविष्य यात्रेद्वारे संदेश देत आहे. मला असे सांगावसे वाटते की या अनुभवातच भारत जोडो यात्रेचा उद्देश सफल झाला. काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त १३७ वर्षांच्या कालखंडातील काँग्रेसचे उध्दिष्ट हे सुरुवातीपासून आजपर्यंत सर्व धर्म समभाव, सर्वांगिण विकास या सूत्रावर आधारीत आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देश विकसित केला व एक बलशाली संविधान दिले तेच आज धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत धोक्यात आलेल्या देशाचे संविधान, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार, धर्मद्वेष इ. साठी काँग्रेस संघटन अधिक मजबूत केले पाहिजे.’’

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, नीता रजपूत, अजीत दरेकर, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, संदिप मोकाटे, हेमंत राजभोज, मनोहर गाडेकर, रजिया बल्लारी, नलिनी दोरगे, चंद्रकांत नार्वेकर, दिपक ओव्हाळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: