fbpx

अभिनेत्री टुनिशा शर्माची आत्महत्या; सेटवरच संपवले जीवन

मुंबई : टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केली आहे. एका मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने आपले जीवन संपवले.  नायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी टुनिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी टुनिशाने शेअर केली होती. टुनिशा शर्माचे वे अवघे 20 वर्षे होते.

टुनिशा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. घटनेनंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टुनिशाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

टुनिशा शर्मा ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री होती. ती टीव्ही मालिका “इश्क सुभान अल्लाह” मध्ये झारा/बबली आणि “इंटरनेट वाला लव” मध्ये आध्या वर्माच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होती.

टुनिशा शर्माचा जन्म 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या 14 व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत  तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.

टुनिशा शर्माने  कलर्स टीव्ही शो इंटरनेट वाला लव्हमध्ये अध्या वर्माची भूमिका साकारली होती. टेलिव्हिजनशिवाय टुनिशा चित्रपटांमध्येही सक्रिय होती. तिने ‘फितूर’ चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती.  बार बार देखो, कहानी 2: दुर्गा रानी सिंह आणि दबंग 3 आदी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: