Pune International film festival 2023 पुढे ढकलला
पुणे : पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येणारा Pune International film festival ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल येत्या 12 ते 19 जानेवारी 2023 दरम्यान पुण्यात रंगणार होता. मात्र काही कारणामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी कळवले आहे.
यंदाचं Pune International film festival च एकवीसावं वर्ष आहे. या फेस्टिव्हलच्या स्पर्धेच्या प्रवेशिका सप्टेंबर महिन्यापासून स्विकारण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे अचानक फेस्टिव्हल रद्द झाल्याने तो पुढे कधी भरवला जाणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
नवीन तारखा लवकरच जाहीर करू
“काही अपरिहार्य कारणास्तव पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. महोत्सवाच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.”
– डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष, पुणे फिल्म फाउंडेशन