अप्पी आमची कलेक्टर विवाह विशेष भाग
अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, तर मागील १६ डिसेंबरच्या भागात पाहिलं अर्जुन अप्पीला एका रोमँटिक सफरीवर घेऊन जातो. पॅराग्लायडिंग करत अर्जुनने अप्पीला प्रपोझ केलं, पण अप्पी अर्जुनशी लग्न करण्यास नकार देते. पण अर्जुन आपल्या म्हणण्यावर ठाम आहे, तो अप्पीला सांगतो माझ्याशिवाय तुझं लग्न होणार नाही. आता अप्पीच लग्न कोणाशी होणार संकल्प, अर्जुन की ती आपल्या बापूंचं ऐकून शिक्षणासाठी निघून जाईल हे २५ डिसेंबरच्या विशेष भागातच कळेल.