fbpx

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कसबा मतदारसंघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : २५डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने नू म वी प्रशाला अप्पा बळवंत चौक येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवडकर यांच्या हस्ते होणार आहे तसेच शहराध्यक्ष जगदिश मुळीक, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली

‘सुमारे १०००रक्तदात्यांच्या रक्तदान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे या साठी बुथप्रमुख ,हजारीभागप्रमुख व मंडल स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरामध्ये ज्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार च्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे त्यांची धन्यवाद मोदीजी पोस्टकार्ड भरून ती थेट पंतरप्रधानांना पाठविण्यात येणार आहेत’ अशी माहिती कोंढरे यांनी दिली यावळी सरचिटणीस छगन बुलाखे ,राजेंद्र काकडे ,शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, संजय देशमुख माधव साळुंखे आदी उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: