fbpx

प्राणीशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी रमले आठवणींमध्ये..!!

विद्यापीठाच्या ‘अल्युमिनाय असोसिएन’कडून मेळाव्याचे आयोजन

पुणे: विद्यापीठातील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी काही माजी विद्यार्थी परदेशातून ऑनलाईन उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘अलुमिनाय असोसिएशन’ आणि प्राणी शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. १९७० सालापासून ते आतापर्यंतचे पदव्युत्तर पदवी, संशोधनाचे असे विद्यार्थी जवळपास दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोबत घडलेले अनेक किस्से, त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. तसेच विद्यापीठातील आजी विद्यार्थ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला.

यावेळी प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.संगीता पंडित, माजी विद्यार्थी संपर्क अधिकारी प्रतीक दामा यांनी याचे आयोजन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.केदार अहिरे यांनी केले.

डॉ.सुरेंद्र घासकडबी, डॉ.एन.एन.गोडबोले, डॉ.आनंद पाध्ये, डॉ.नरेंद्र नायडू, डॉ.श्रीकांत घारे, डॉ.केदार देवभानकर, डॉ.मंजुषा तळवलकर, डॉ.अभय पत्की आदी ज्येष्ठ माजी विद्यार्थी उपस्थित होते. तर डॉ. चित्रा पणीकर, डॉ.नुसरत परवीन, डॉ. मुदासिर दार, श्लोक चित्रे, ऋषिकेश भुसनाळे, डॉ.मेहरूनिसा राजे आदी अलीकडच्या काळातील माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते.

विद्यापीठाच्या अलुमिनाय असोसिएशनच्या माध्यमातून अनेकदा माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यामुळे सर्व विद्यार्थ्यांशी नाळ विद्यापीठाशी जोडलेली राहावी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेशी नातं टिकवून ठेवता यावे असा या असोसिएशनचा उद्देश आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर असलेल्या असोसिशनच्या लिंकवर जात नावनोंदणी करावी असेही आवाहन असोसिशनचे संचालक डॉ.संजय ढोले यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: