fbpx

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अन्यायकारक; बदल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम मतदारांसाठी, उमेदवारीसाठी ,पुणे,मुंबईवर व महाराष्ट्रातील अन्य गावांमधील सभासदांवर अन्याय करणारा असल्याने .. त्यात तातडीने बदल करण्याची मागणी सलाम पुणेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार शरद लोणकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांच्याकडे केली आहे. 

या निवेदनात शरद लोणकर यांनी म्हटले आहे की,  अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम, निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केला आहे, तो सोबत जोडला आहे. महामंडळाचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील असे एकूण ६२५५ मतदार असल्याचे याच निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले आहे . निवडणूक कार्यक्रम ऑक्टोबर मध्ये जाहीर केला असला तरी तो प्रत्यक्षात १५ नोव्हेंबर पासून सुरु झाला त्याच दिवशी आम्हास समजला तो या दिवशी कच्ची मतदार यादी जाहीर करण्यात आली.
या निवेदनाची मुख्य तक्रार – आणि मागणी –
१) मतदार यादीत सूचना,दुरुस्ती व हरकती बाबत केवळ कोल्हापूर कार्यालयात जाऊनच तक्रार करायची ,आणि त्यावर काहीही निवाडा न घेता पुन्हा कोल्हापुरातून मुंबई,पुणे अथवा आपापल्या गावी परत जायचे किंवा कोल्हापुरातच काही दिवस म्हणजे निवाडा होईपर्यंत संबधीताने मुक्काम करायचा.हे चुकीचे आहे.ते कोल्हापूरसमवेत मुंबई ,पुणे या कार्यालयातून देखील होणे गरजेचे होते .
२) दुसरी महत्वाची तक्रार अशी कि , १० जानेवारी २३ ते १६ जानेवारी २३ या दरम्यान उमेदवारी अर्ज देणे आणि स्वीकारणे हे देखील केवळ कोल्हापुरातच ठेवण्यात आले आहे. यामुळे उमेदवारी अर्जासोबत लागणारे कागदपत्रे , सूचक आणि अनुमोदक अशा सभासद व्यक्ती हे सारे घेऊन कोल्हापुरात यासाठी २ दिवस राहावे लागेल अशा पद्धतीचा कार्यक्रम करण्यात आला आहे.जो पुण्या, मुंबई सह महाराष्ट्रातील अन्य सर्व गावातील शहरातील सभासदांवर अन्याय करणारा आहे .यापूर्वी उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारणे हि प्रक्रिया मुंबई पुणे कार्यालयात देखील झालेली आहे. मतदान मुंबई , पुणे , कोल्हापूर अशा तीन ठिकाणी घेण्यात येते . मग मतदार यादीतील दुरुस्त्या ,हरकती , निवाडा आणि उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारणे या गोष्टी देखील कोल्हापूर समवेत मुंबई, पुणे कार्यालयात होत होत्या , त्या यावेळी देखील व्हायला हव्यात .आणि हि आमची मागणी आहे .
पाच वर्षासाठी ज्यांना निवडून दिले होते त्यांनी सुमारे सात वर्षाचा कालावधी पदरात पाडून घेतला आहे .२ वर्षे निवडणुका उशिरा होत आहेत .त्यामुळे आता तरी याबाबत तातडीने हस्तक्षेप करून कोल्हापूर समवेत पुणे मुंबई येथे असलेल्या महामंडळाच्या कार्यालयात धर्मादाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली उमेदवारी अर्ज देणे ,घेणे , माघारी घेणे या प्रक्रियेचा तरी आता समावेश करावा हि विनंती . असे लोणकर यांनी नमूद केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: