fbpx

नादुरुस्त ध्वनीक्षेपकामुळे विधीमंडळ कामकाज थांबवावं लागण राज्य सरकारचं मोठं अपयश

मुंबई :- विधीमंडळाच्या कामकाजावर कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. विधीमंडळ सदस्य आपला अमूल्य वेळ कामकाजासाठी देत असतात. राज्यातील जनतेचं लक्ष कामकाजाकडे लागलेलं असतं. कामकाजातील प्रत्येक मिनिट महत्वाचं असतं. विधीमंडळाचा वेळ वाया जावू नये म्हणून विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करत असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद पडल्याने सभागृहाचं कामकाज थांबवावं लागणं योग्य नाही. ज्या यंत्रणेवर ही जबाबदारी आहे ती यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरली आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणा वारंवार बंद पडणं आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज थांबवावं लागणं, हे सरकारचंही अपयश असून मी या प्रकाराचा निषेध करतो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: